श्री गणेश कारखाना ६३ वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न
श्री गणेश सहकारी साखर कारखाना ६३ वा गळीत हंगाम शुभारंभ गोदावरी धाम सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज,उपासनी महाराज संस्थान कन्यावृंद आणि सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी चेअरमन सुधीर लहारे,व्हा.चेअरमन विजय दंडवते,सर्व आजी माजी संचालक व मोठ्या संख्येने सभासद शेतकरी,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की अनेक अडचणीतून मा.बाळासाहेब थोरात आणि विवेकभैय्या कोल्हे यांनी हा कारखाना सुरू केला त्यांनी उत्तम चालवला आणि भावही चांगला दिला.ही आपली कामधेनू आहे ती वाढवणे जपणे आपले काम आहे.कुणीही इथून बाहेर ऊस घेऊन जाऊ नये ही भावना रास्त आहे कारण अनेक संकटातून ही संस्था टिकवली गेली आहे.थोरात साहेब आणि विवेकभैय्या यांनी ही घडी बसवली आहे.आपल्या परिसरात आर्थिक समृध्दता होण्यासाठी ही कामधेनू महत्वाची आहे.जर घरात दारिद्र्य असेल तर कुटुंबाला संकट सहन करावे लागते त्यामुळे परिस्थिती पाहून आपण नियोजन जर अचूक केले तर प्रत्येक संकटावर मात करणे शक्य आहे.जो दोन पावले मागे घेऊन दुसऱ्यांच्या मुखात घास घालतो तो देव असतो आणि जो ओरबाडून खाण्याचा प्रयत्न करतो तो दानव असतो असे विविध उदाहरणे देत उपस्थितांना संतवचनांचे माध्यमातून कारखाना एक कुटुंब आहे त्याप्रमाणे सर्वांनी पुढे नेण्यासाठी आशीर्वाद दिले.श्री गणेशाच्या कृपेने कारखाना संकटातून बाहेर आला.विवेकभैय्या आणि थोरात साहेब यांनी लक्ष घातले म्हणून कारखाना चांगल्या अवस्थेत आला.पुढेही चांगला भाव मिळून परिसराची भरभराट व्हावी यासाठी आपला ऊस आपल्याच कारखान्याला द्या रामगिरी महाराज म्हणाले.विवेकभैय्या कोल्हे यांनी गळीत हंगाम हा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ केला जात असतो ती परंपरा खंडित होऊ न देणे यासाठी सर्वांचा प्रयत्न होता.ही संस्था अतिशय प्रतिकूल काळातून आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाने आपण पुढे घेऊन जातो आहोत.अनेक आर्थिक आणि तांत्रिक संकटे पार करत गतवर्षी चांगली घोडदौड केली आहे मात्र यावेळी कारखाना अधिक पुढे घेऊन जायचा असेल तर गाळपाचे उद्दिष्ट मोठे ठेवत पुढे जावे लागेल.ऊस बेणे चांगले लागवड करने गरजेचे आहे.निळवंडेचे पाणी आगामी काळात उपलब्ध होणार आहे त्यातून अधिकाधिक ऊस लागवड होणे गरजेचे आहे.कार्यक्षेत्रात ऊस मुबलक झाला तर बाहेरून ऊस आणावा लागणार नाही पर्यायाने खर्च कमी येऊन कारखाना नफ्यात येईल.अनेक उपपदार्थ निर्मिती करण्याकडे भर असून गणेश कारखान्याचे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावलौकिक करण्याकडे आमचा प्रयत्न असेल.राजकीय धामधूम सुरू असताना थोरात साहेबांशी देखील वेळोवेळी गणेशच्या संदर्भात माझे पूर्ण लक्ष आहे असे म्हणालो.संचालक मंडळाने अपेक्षा व्यक्त केली होती की गणेश कार्यक्षेत्रातील ऊस कुणी नेऊ नये त्यावर संजीवनी आणि संगमनेर यांनी इथला ऊस नेला नाही मात्र दुर्देवाने काही कारखाने टोळ्या टाकतात त्यांनी गणेश रणभूमी करू नये तर सहकार्य करावे.जर कुणी गणेश कार्यक्षेत्रातील ऊस पळवा पळवी केली तर भविष्यात गणेश कारखाना देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात घुसेल हे ध्यानात ठेवावे असा सूचक इशारा देखील दिला.यावेळी गंगाधर चौधरी, शिवाजीराव लहारे, दिलीपराव रोहम, रामचंद्र बोठे, चंद्रभान धनवटे, चंद्रभान गुंजाळ,डॉ.एकनाथ गोंदकर, ज्येष्ठ संचालक ॲड.नारायणराव कार्ले,दीपक चोळके, उत्तमराव मते, शशिकांत लोळगे, उत्तमराव घोरपडे, गणपतराव धरम,धनंजय गाडेकर, बलराज धनवटे, सुरेश गमे, भिकाजी घोरपडे, डॉ. वसंतराव लबडे, जयराज दंडवते, विक्रम वाघ, रमेश गागरे, सखाराम चौधरी, संजय सरोदे, विठ्ठल डांगे, योगेश निर्मळ, सौ.लताताई डांगे,संगमनेर कारखाना एम डी श्री.घुगरकर साहेब, कोल्हे कारखाना साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे,गणेश कारखाना प्र. एम डी नितीन भोसले आदींसह शेतकरी, अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
0 टिप्पण्या