यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी होते यावेळी व्यासपीठावर गणेश चे माजी संचालक भाऊसाहेब चौधरी, अण्णासाहेब चौधरी,एकनाथ चौधरी,आदी जेष्ठ श्रेष्ठ नागरीक विराजमान होते.जेष्ठ नेते गंगाधर चौधरी अध्यक्षस्थानी भाषण करताना म्हणाले की माजी आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या आदेशाप्रमाणे युती धर्म पाळून त्या निवडणुकीत महायुती (अजित पवार) गटाचे उमेदवार आ.आशुतोष काळे यांना भरघोस मतांनी निवडून आणले आहे राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना महायुती मित्र पक्षामध्ये सामावून घेऊन आम्ही भाजप पक्षाच्या व पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे प्रामाणिकपणे युती धर्म पाळला आहे भाजपा पक्षाशी प्रामाणिक राहून इमानदारीने सर्वांनी काम केले म्हणून सर्व कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानावे तेवढे कमी आहे.युवा नेते विवेक कोल्हे यांनी २०२४ सालच्या विधानसभा निवडणूकित थांबायचे ठरविले महायुतीचे उमेदवार आ.आशुतोष काळे यांना निवडणुकीत सर्वस्तरावर मदत केली भाजपा पक्षश्रेष्ठींच्या शब्दाला कोल्हे कुटूंबियाणे प्रतिसाद दिला आ.आशुतोष काळे यांना मदत करण्याचे आश्वासन देवून सर्वस्तरावर मदत करून निवडून आण्यासाठी मदत केली.यावेळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३० जागा विजयी करून आणण्यात पूर्णपणे यश आले भाजप पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षात खुप चांगले काम केले आहे यापुढेही अशाच पद्धतीने महायुतीने मित्रपक्षाने एकी दाखवावी आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकजूट करून निवडणुका लढाव्यात.
पुणतांबा मंडळातील ११ गावांनी युतीधर्म पाळून आ.आशुतोष काळे यांना मतदान केले १ लाख २४ हजार ६२४ अश्या भरघोस मतांनी विजयी करून निवडून आणले भाजपा महायुती मित्रपक्षाने आ.आशुतोष काळे यांना पाठबळ देण्याचे धोरण आखल्यामुळे कोपरगाव मतदार संघामध्ये बऱ्यापैकी मत विभागणी टळली म्हणून महायुतीचे उमेदवार आ.आशुतोष काळे यांना निवडून येण्यास सोपा मार्ग तयार झाला यावेळी निवडणुकीत १ लाख २४ हजार ६२४ अश्या मोठया मतधिक्याने निवडून आले मागील पाच वर्षात आ.आशुतोष काळे यांनी महायुती व मित्र पक्षाच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मतदार संघामध्ये भरघोस निधी आणून विविध सोयी सुविधा नागरिकांना देवू केल्या आहे आ.आशुतोष काळे यांचे मतदारसंघातील कामे चांगले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने शेवटच्या सहा महिन्यात भरघोस योजना अंमलात आणून सर्व महिलांच्या पाठीशी उभे राहिले शेतकऱ्यांना विविध विमा योजनांचा लाभ मिळाला याच बरोबर शेतकऱ्याला शेतीमध्ये वीज मोफत करून देण्यात आली आता वीज बिलही शून्य रुपये येत आहे महायुतीने घेतलेले सर्वच निर्णय सर्वांच्या दृष्टीने अतिशय हितकारक आहेत.