विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराचे झालेले अपहरण प्रकरणी दाखल गुन्हयातील पिडीत उमेदवाराचा तात्काळ शोध , अहिल्यानगर पोलीसांची कारवाई

प्रतिनिधी युनूस इनामदार (शिर्डी) :-
 प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, श्री.राजु धर्माजी शिंदे, वय 49, रा.करोडी, ता.जि.छत्रपती संभाजीनगर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) मतदार संघामधुन अपक्ष उमेदवार म्हणुन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.गुन्हयाचे फिर्यादी श्री.मंगेश काशिनाथ जाधव, वय 29, रा.करोडी, ता.जि.छत्रपती संभाजीनगर हे उमेदवार व नातेवाईकांसोबत शिर्डी येथे देवदर्शनाकरीता आलेले होते. दिनांक 03/11/2024 रोजी दुपारी 03.30 वा.सुमारास शिर्डी येथुन नाशिककडे अपक्ष उमेदवार श्री.राजु धर्माजी शिंदे व त्याचे नातेवाईकांसोबत इरटिका कारमधुन जात असताना संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे हुंडाई क्रेटा गाडी क्रमांक एमएच-20-जीके-9004, इनोव्हा गाडी व एक सफेद रंगाच्या वाहनाने त्यांना आडवून 8 ते 10 अनोळखी इसमांनी राजू धर्माजी शिंदे यांना तु उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे की नाही असे विचारून त्यांना, तसेच त्यांची पत्नी चंद्रकला राजू शिंदे, बहीण ताराबाई किशोर तुपे व दाजी किशोर तुपेर यांना क्रेटा गाडीमध्ये बसवून पळवून नेले. याबाबत शिर्डी पो.स्टे.गु.र.नं. 599/2024 बीएनएस कलम 126 (2), 137 (2) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.


 मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराचे झालेले अपहरण प्रकरणी दाखल गंभीर गुन्हयाची तात्काळ दखल घेऊन मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांचे नेतृत्वाखाली श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग व श्री.दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून, गुन्हयातील अपहरण झालेल्या व्यक्तीचा तात्काळ शोध घेणेबाबत मार्गदर्शन केले. 
तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिर्डी व संगमनेर येथे घटनाठिकाणी जाऊन, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करून, गुप्त बातमीदारास घडलेल्या गुन्हयाची माहिती देऊन अपहरण झालेल्या व्यक्तीबाबत शोध घेत असताना, तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत अपहृत श्री.राजू धर्माजी शिंदे हे नारेगाव, चिखलठाणा परिसरात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अंमलदार यांनी छ.संभाजीनगर येथे अपहृत श्री.राजू धर्माजी शिंदे यांचा शोध घेतला असता ते नारेगाव, चिखलठाणा परिसरात त्यांचे नातेवाईक यांचे घरी मिळून आले.

तपास पथकाने अपहृत श्री.राजू धर्माजी शिंदे व त्यांचे नातेवाईक यांना विश्वासात घेऊन, विचारपूस करून त्यांचे सविस्तर जबाब नोंदविले. श्री.राजू धर्माजी शिंदे यांना विचारपूस केली असता ते दिनांक 03/11/2024 रोजी दुपारी 03.30 वा.सुमारास शिर्डी येथून नाशिककडे जात असताना समनापूर, ता.संगमनेर येथे चहा नाष्टयांसाठी थांबलेले असताना तेथे त्यांचे भाऊ सुरेश शिंदे यांचेशी भेट झाली.मोबाईल बंद असलेबाबत भावाने विचारणा केली असता चार्जींग संपल्याने मोबाईल बंद होता असल्याचे सांगीतले. घरचे लोक काळजीत असल्याने ते त्यांचे भावासोबत छ.संभाजीनगर येथे आलेले होते. तसेच मला कोणीही बळजबरीने घेऊन आलेले नाही असे सांगीतले.

 तसेच राजू धर्माजी शिंदे यांची पत्नी, बहीण व दाजी किशोर तुपे यांचेकडे देखील सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी देखील त्याचे कोणीही अपहरण केले नसलेबाबत जबाब दिलेले आहेत. गुन्हयांचा पुढील सविस्तर तपास सपोनि/बलैय्या, नेम.शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली मा. श्री. वैभव कलुबमे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व मा. श्री.शिरीष वमने, साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या