आम्ही आ.आशुतोष काळेंच्या पाठीशी,त्यांना भरघोस मतांनी निवडून आणू - गंगाधर चौधरी

राहाता ( प्रतिनिधी प्रविण दरंदले ):- आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघात विकासाची अनेक कामे केली असून मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावांना देखील न्याय दिला आहे त्यांच्यासारखे कुशल नेतृत्व आपल्या मतदार संघाला लाभले हे मतदार संघाच्या नागरिकांचे भाग्य आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव, एलमवाडी पंचक्रोशीतील सुज्ञ मतदार आ.आशुतोष काळेंच्या पाठीशी असून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणू असे प्रतिपादन जळगावचे किसान संघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर चौधरी यांनी केले आहे. कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील जळगाव येथील रोकडोबा मंदिरात गुरुवार (दि.७) रोजी महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव, यलमवाडी पंचक्रोशीतील सुज्ञ मतदारांनी आ.आशुतोष काळे यांच्यासारख्या कर्तुत्ववान नेतृत्वाला पुन्हा विधानसभेत पाठविण्यासाठी एकत्र यावे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून चांगल्या लीडणे व भरघोस मतांनी आ.आशुतोष काळे यांना निवडून आणून विजयी करायचे आहे. आगामी निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी जबाबदारी घेतली आहे म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत विजय करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्याच ताकदीने व खंबीरपणे उभे राहणार आहे आणि आ. आशुतोष काळेना पाठिंबा देवून भरघोस मतांनी निवडून आणणार आहे असे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते गंगाधर चौधरी यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी होते याप्रसंगी अण्णासाहेब चौधरी गणेश चे माजी संचालक भाऊसाहेब चौधरी गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी जळगावचे सरपंच शिवाजी साबदे उपसरपंच दिलीप चौधरी, शंकरराव चौधरी, यशवंत चौधरी सोसायटी चेअरमन सुरेश औताडे, सुरेश चौधरी, एम.टी चौधरी सार्थक कृषी सेवा केंद्राचे संचालक विजय चौधरी, शरद चौधरी,राजेंद्र चौधरी, एल.आर गायकवाड, आण्णासाहेब चौधरी, गणेश थोरमोठे, शेखर साबदे, आदींसह जळगाव ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र चौधरी यांनी केले प्रास्ताविक सरपंच शिवाजी साबदे यांनी केले उपसरपंच दिलीप चौधरी यांनी आभार मानले.
ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी पुढे बोलताना म्हणाले की महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यापासून सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने खूप हितकारक निर्णय घेतले आहे त्यात पिण्याच्या पाण्याचा गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न असेल प्रत्येक नागरिकाला कसं आपल्याला न्याय देता येईल या सरकारने गेल्या अडीच वर्षात हितकारक योजना राबविल्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि मंत्री रामदास आठवले साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे हे चारही गटातील उमेदवार आहेत महायुती अडीच वर्षापासून सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.महायुती मित्रपक्षाने मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात हितकारक व चांगली कामे केली म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नागरिक प्रेम करत आहे याच दृष्टीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार अशितोष काळे हेही याच पावलावर पाऊल ठेवून विकास कामे करत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.यावेळी सरपंच शिवाजी साबदे म्हणाले की गेल्या पाच वर्षात राजकीय परिस्थिती अस्थिर झाली होती आणि अशा असतील परिस्थितीतही कोरोनामारी संकट आले होते परंतु या दोन्ही आव्हानांना तोंड देऊन कार्यसम्राट आमदार आशुतोष काळे यांनी विकासाचा एक पर्व गाठला कोपरगाव मतदार संघात त्यांनी विक्रमी निधी आणला मोठ्या प्रमाणात विकास केला जळगाव व यलमवाडी साठी आमदार काळे यांनी भरघोस या निधीच्या माध्यमातून गावातील भरपूर विकास कामांनी वेग धरला व कामेही झाली येलमवाडी रोडचे डांबरीकरण गावातील समाज मंदिर असे बरेच जनहिताचे कामे मागील पाच वर्षात आमदार आशुतोष काळे यांनी निधी मंजूर करून देत करून दिलेली आहे खऱ्या अर्थाने आमदार अशितोष काळे यांनी निश्चितच जळगाव येलमवाडी गावासाठी आत्तापर्यंत कधी न आलेल्या निधी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात मंजूर करून दिला निश्चितच या पंचवार्षिक निवडणुकीला ही आमदार आशुतोष काळे हे भरघोस मतांनी निवडून येणार आहे असा आमचा विश्वास आहे आगामी काळात गावातील भरपूर विकास कामे मार्गी लागणार आहे असा विश्वास सरपंच शिवाजी साबदे यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या