राहाता (प्रतिनिधी :- प्रविण दरंदले):- बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे, सहकारी साखर कारखानदारीसमोर खाजगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, गणेश या परिसराची कामधेनु असुन ती टिकावी येथील उस उत्पादक शेतकरी सभासद व त्यावर अवलंबुन असलेल्या घटकांची आर्थीक क्रयशक्ती वाढावी याच उददेशांने आजवर वाटचाल सुरू असुन गेल्या हंगामात सभासदांना दिलेला शब्द खरा करून दाखविला, अहिल्यानगर जिल्हयाबरोबरच राज्यातही सहकारी साखर कारखानदारीत गणेशचे नांव सार्थ ठरवु असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
राहाता तालुक्यातील श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ बुधवारी विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी गणेशचे चेअरमन सुधीर लहारे होते.सूत्रसंचालन प्रभारी कार्यकारी संचालक नितीन भोसले यांनी केले.
विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, या भागातील शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गणेश परिसरातील बंधारे पुर्ण क्षमतेने भरून घेत जिरायती भागाला वरदान असणा-या निळवंडे धरण व त्याच्या वितरीकांचे काम जलदगतीने मार्गी लागण्यासाठी वरिष्ठस्तरावरून आपले प्रयत्न सुरू आहेत.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेती, शेतकरी आणि पाणी या प्रश्नांवर सातत्यांने संघर्ष करत राहाता तालुक्यातील गणेशची कामधेनु टिकवुन ठेवण्यांसाठी सातत्यांने सहकार्य केले त्याच पावलांवर पाउल ठेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व संगमनेर कारखान्यांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, गणेशचे सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशने चालु गळीत हंगामात तीन ते साडेतीन लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उददीष्ट ठेवले असुन त्यादृष्टीने कारखान्यातील काही विभागाचे आधुनिकीकरण करत सायलोसिस्टमसह अन्य कामे हाती घेत ती पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न चालू आहे.
या भागातील उस उत्पादक सभासदांनी गणेशच्या निवडणुकीत परिवर्तन घडवत त्याची धुरा आपल्या हाती दिली त्या विश्वासाला पात्र राहुन काम सुरू आहे, कार्यक्षेत्रात उसाची जास्तीत जास्त लागवड करावी, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाबरोबरच मत्स्यपालन, बांबुलागवड यासारखे उपक्रम गणेश परिसरात राबवुन शेतकरी सभासदांसह सर्वांनाच पुढे घेवुन जाउ असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, गणेश हाती घेतांना अनंत आर्थीक अडचणी आल्या पण त्यावर हळुहळु मात करण्यांचे प्रयत्न सुरू आहे, साखर कारखानदारी हा उद्योग चार महिन्यापुरता न राहता तो बारमाही चालु राहण्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडे आपले प्रयत्न सुरू आहेत असे ते म्हणाले.
या उद्घाटन प्रसंगी चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजयराव दंडवते, संजीवनीचे सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे,गंगाधर चौधरी, शिवाजीतात्या लहारे,रामचंद्र बोठे, यतीन गमे,महेंद्र शेळके,संजय शेळके,एकनाथ घोगरे,डॉ.वसंतराव लभडे,राजेंद्र घोगरे,चंद्रभान गुंजाळ,विठ्ठल शेळके,सोन्याबापू चौधरी,चंद्रकांत धनवटे,आण्णासाहेब वाघे,मधुकर वाबळे,भिकाजी घोरपडे,नितीन सदाफळ, धनंजय गाडेकर,श्रीकांत मापारी,संजय सरोदे,अविनाश दंडवते,भाऊसाहेब चौधरी,भाऊसाहेब थेटे,राजू अग्रवाल,भारत तूरकणे आदींसह सर्व संचालक,ऊस उत्पादक सभासद,शेतकरी बांधव,अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश साखर कारखान्याचा साखर उतारा जिल्हयात सर्वाधिक आहे, चालु गळीत हंगामात खर्चात काटकसर करून येणा-या अडचणींवर मात करत सर्वांच्या सहकार्याने पुढे जाउ, अन्य कारखान्यांनी गणेशच्या उसाची पळवापळवी करू नये, येथील उस उत्पादक सभासद शेतक-यांनी गणेश ही आपली कामधेनू आहे, तेंव्हा प्रथम प्राधान्यांने गाळपासाठी उस द्यावा असे आवाहन विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
0 टिप्पण्या