गणेश कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांनी नेऊ नये - शिवाजी लहारे

गणेशनगर ( प्रतिनीधी - प्रविण दरंदले )श्री गणेश कारखाना हा प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा नव्या जोमाने पुढे जातो आहे.गणेश परिसरातील शेतकऱ्यांना योग्य भाव, कर्मचाऱ्यांना न्याय व सभासद शेतकरी यांचा विश्वास जपण्याचे काम केले जाते आहे.कारखान्याचे मार्गदर्शक आ.बाळासाहेब थोरात आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या माध्यमातून गेले काही वर्षे अनेक अडचणीत गेलेल्या गणेशची घडी बसवण्यात नवीन संचालक मंडळाला यश येते आहे.याच दरम्यान मात्र शेजारील कारखाने गणेशचा कार्यक्षेत्रातील ऊस पळवण्याचे काम करता असा अनुभव मागील हंगामात आला त्यामुळे त्यांनी चालू हंगामात असे प्रकार करू नये कारण गणेश परिसर हा स्वाभिमानी आहे सर्व काही लक्षात ठेवतो याची जाणीव सर्वांनी ठेवावी असे गणेश कारखाना माजी व्हा.चेअरमन शिवाजीतात्या लहारे यांनी स्पष्ट केले आहे.गणेश कारखाना ६८ वा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा पार पडला यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पुढे म्हणाले की जर आमचा परिसर गणेश कारखाना तेजीत आल्यावर आनंदी होत असेल तर त्यात कुणी अडथळा आणू नये. एक नैतिक संकेत म्हणून कारखाने आपापल्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडून नेतात मात्र दुर्दैवाने एखाद्या युद्धभूमी प्रमाणे गणेश कार्यक्षेत्रातील ऊस नेण्याचे काम काही कारखाने करतात त्यांनी यावेळी असे करू नये अन्यथा गणेश परिसराचे मन दुखावले तर त्याचे त्यांना तोटे होऊ शकतात हा विनंती वजा इशारा समजून इतरांनी कृती करावी.राजकिय,सामाजिक भूमिका घेण्यात गणेश परिसर हा अतिशय संवेदनशील मानला जातो.कुणीही इथला ऊस नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दुष्परिणाम होतील मात्र सहकार्य केले तर त्याची देखील जाणीव आम्ही जपणारे लोक आहोत.यापूर्वी संजीवनी आणि संगमनेर यांनी स्वतः ऊस पुरवठा करून गणेश तारला आहे तो आदर्श ठेवत इतरांनी केवळ ऊस पळवला नाही तरी या परिसराच्या भूमिकेचा आदर ठेवला असे होईल अशी सर्वांची भावना आहे.कमी गाळप झाले तर आर्थिक नुकसान कारखाना सहन करतो पर्यायाने बाजारपेठेला देखील चलन फिरण्यास अडचण येते यासाठी आमचा ऊस आमचा कारखाना या धोरणाला तडा देण्याचे काम शेजारील काही कारखान्यानी या पूर्वी केले आहे त्यांनी ते करू नये असे शेवटी लहारे यांनी स्पष्ट केले आहे.

 गणेश ही अनेकांची कामधेनू असून कारखाना सुरळीत राहिला आणि अधिक गाळप झाले तर सर्वसामान्य सभासद,कर्मचारी आणि बाजारपेठ तेजीत येण्यास मदत होणार आहे.इथला कार्यक्षेत्रातील ऊस कुणीही बाहेर नेण्याचा प्रयत्न करू नये ते कुणाच्याही हिताचे नसेल याची जाणीव ठेवावी.
                - सुधीर लहारे ,चेअरमन,गणेश कारखाना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या