श्रीरामपूर: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवार दि. 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,(काल) दि. १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११/३० वा सुमारास डॉ. संजय फरगडे, जनार्धन गालपगारे, असे मातापुर येथे माझे कार्यकर्ते संजय लबडे यांची बोलेरो गाडी ( एम एच १७ सीएम७१९१) मध्ये ड्रायव्हर चेतन तनपुरे यांचेसह मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो. तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आम्ही चौघे बोलेरो गाडीत बसुन रात्री ०१/०० च्यासु मारास श्रीरामपुर कडे निघालो. गाडीमध्ये चालकाच्या शेजारील सिटवर बसलेलो होतो. त्यावेळी प्रवास करत असतांना माझ्या लक्षात आले की, दोन मोटारसायकल आमचा पाठलाग करत आहेत. त्याबाबत मी माझे सोबतचे लोकांना सांगितले.
काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगरचे मुख्य गेट आले. संरक्षणासाठी कारखान्याच्या गेटमधुन गाडी आत घेण्यास मी चालकाला सांगितले. चालकाने गाडी गेटकडे वळविली परंतु त्यावेळी कारखान्याचे गेट अर्धवट बंद होते. त्यामुळे आमची गाडी आत जावु शकली नाही म्हणुन चालकाने गाडी उभी केली.
त्यादरम्यान पाठलाग करणाऱ्या दोन मोटारसायकल वरील व्यक्तिनी त्यांच्या मोटारसायकल रोडच्या बाजुला उभ्या करुन तीन व्यक्ति अंदाजे २० ते २५ वयोगटातल्या त्यापैकी दोघे शरीराने सडपातळ असे आमच्या उभ्या असलेल्या बोलेरो गाडीच्या समोर चालत आले. त्यामुळे मी चालकाला आमची बोलेरो गाडी मागे घेवुन पुन्हा श्रीरामपुरच्या दिशेने घेण्यास सांगितली. चालक तनपुरे हा गाडी मागे घेत असतांना गाडीच्या समोरील तिघांपैकी सडपातळ बांध्याच्या एका व्यक्तिने त्याचे कंमरेतुन एक पिस्टल काढुन आमच्या गाडीच्या दिशेन एक गोळी फायर केली. परंतु आमची गाडी वेगात मागे घेतल्याने ती गोळी गाडीला न लागता हवेत गेली. त्यानंतर आम्ही गाडी वेगात चालवुन श्रीरामपुरच्या दिशेने निघालो. श्रीरामपुरमध्ये येवुन आम्ही माझे मित्र श्री प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो.
व त्यानंतर घडले प्रकाराबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला येवुन तीन अज्ञात व्यक्तिविरुध्द फिर्याद दिली.
0 टिप्पण्या