खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जळगावतील तीन मुख्य अधिकृत रस्त्यांचे कामे मार्गी लागणार.

चितळी:(प्रतिनिधी:- प्रवीण दरंदले) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन विकास समिति अंतर्गत शिर्डी मतदारसंघातील जळगाव (ता.राहाता) येथील विविध रस्त्यांचे प्रश्न आता मार्गी लागणार आहे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केलेल्या विशेष शिफारशी नुसार जळगाव (ता.राहाता) येथील गावांतर्गत असलेल्या तीन रस्त्यांच्या विकासासाठी प्रत्येकी (९९९.९५३ लक्ष) रुपयांच्या निधीची उपलब्धता करून पुढील कामे सुरू होण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिफारसी नुसार जिल्हा नियोजन विकास समिति अंतर्गत (दी.३०) जळगाव (ता.राहाता) येथील रस्त्यांच्या विकासकामासाठी लवकरच ई- निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.मौजे जळगाव (जूने) ते खैरी रोड (महेंद्र चौधरी यांच्या घरापासून ते रेल्वे चौकी पर्यंत) रस्ता मजबूतीकरण करण्यासाठी (९९९.९५३ लक्ष) रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.याच बरोबर मौजे जळगाव (रा.मा ३५) पुणताबा जळगाव (प्रजीमा ११) चितळी स्टेशन मार्ग (जळगावपासून) रस्ता मजबुतीकरण करणे (९९९.९५३ लक्ष) मौजे जळगाव ते लाल वाडी रस्ता मजबुतीकरण (९९९.९५३ लक्ष) गावांना जोडणाऱ्या परिसरातील तीन मुख्य रस्त्यांची कामे करण्याबाबत प्रशासकीय मान्यता मिळालेली असून ई- निविदा प्रक्रिया मिळण्यासाठी पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे जळगाव परिसरातील अनेक वर्षापासून दयनीय झालेल्या रस्त्यांची अवस्था आता लवकरच सुधारणार असून रस्त्यांच्या मजबुती करण्याची कामे मार्गी लागणार आहे अशी माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतीच पत्रकाद्वारे दिली आहे.

जळगाव येथील दोन्ही रस्त्याची अवस्था अतिशय कठीण झाली होती पावसाळ्यात दूध उत्पादक शेतकरी शालेय विद्यार्थी यांना ये-जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता विद्यमान खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी रस्त्यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेतली जिल्हा नियोजन विकास समितीच्या अंतर्गत (९.९९.९५३ लक्ष) रुपये निधी मंजूर झाला असल्याचे पत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आता रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे याबद्दल जळगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. खा.वाकचौरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सदर कामाबाबत सुचित करून कामाची सुरुवात करावी..- जेष्ठ नेते,गंगाधर चौधरी 

पूर्वीपासून अधिकृत असलेला जुना खैरी रस्ता या कामामुळे पुन्हा पुनर्जीवित होणार आहे सदर रस्ता अनेक वर्षापासून वहिवाटीसाठी बंद होता खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विकास कामांच्या माध्यमातून जळगाव परिसरातील तिन्हीमुख्य रस्त्यांचा तिढा आता सुटला आहे जळगाव ते जुना खैरी रस्त्याची अधिकृत नकाशावर नोंद आहे तरीपण रस्ता खराब असल्याने नियमित वापरात येत नव्हता परंतु: या कामाच्या निमित्ताने अनेक वर्षाच्या कालावधीनंतर जळगाव ते जुना खैरी रस्ता अधिकृतपणे पुन्हा वापरात येणार आहे..:- महेंद्र चौधरी,स्थानिक नागरीक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या