चितळी परिसरात बिबट्याने केली शेळी ठार ,बिबट्याच्या हल्ल्या मधुन शेतकरी थोडक्यात बचावला

चितळी: (प्रतिनिधि :- प्रविण दरंदले)
चितळी (ता.राहाता) परिसरामध्ये बिबट्याचा हौदोस चांगला वाढलेला आहे (ता. ८) दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास बिबट्या सदृश्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये शेळी गतप्राण झाल्याची घटना नुकतीच चितळी गावाच्या परिसरामध्ये घडली आहे. शेळीवर हल्ला केल्यानंतर शेळ्यांच्या कळपा पासून थोड्याच अंतरावर शेतकरी ऋषिकेश वाघ उभे होते त्यांनी वेळीच राखलेल्या प्रसंगवधनामुळे हल्ला करण्याच्या फिराकीमध्ये असलेल्या बिबट्याला काठीपासुन संरक्षण करत आरडाओरड करून पिटाळून लावले असून या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे..
सविस्तर घडलेली घटना अशी की चितळी गाव खंडोबा मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे ऋषिकेश दशरथ वाघ हे नेहमीप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास चितळी-धनगरवाडी परिसरातील डिस्टीलरीच्या खड्ड्या शेजारी गाया, व शेळ्यांचा कळप चारण्यासाठी घेऊन गेले होते परंतु याचवेळी शेजारील पडिक शेतामध्ये चरत असलेल्या शेळीवर अचानक बिबट्याने हल्ला चढवून शेळीच्या नरडीचा घोट घेऊन तिला जागीच ठार केले बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शेळी गतप्राण झाली असून शेळ्यांच्या कळपा सोबत असलेले शेतकरी ऋषिकेश दशरथ वाघ यांच्यावर देखील बिबट्या हल्ला करणार होता परंतू इतक्यातच त्यांनी सतर्कता बाळगून त्यांच्या हातात असलेल्या काठीने बिबट्याला पिटाळून लावले असून याच परिसरामध्ये आत्ताच्या वेळी बिबट्या निदर्शनास आलेला असून चितळी परिसरामध्ये बिबटयाचा वावर चांगलाच वाढलेला आहे या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा याचबरोबर वनविभागाने तात्काळ घडलेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मदत द्यावी अशी मागणी ऋषिकेश वाघ व अतुल चौधरी आदीं ग्रामस्थांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या