श्रीरामपूर(प्रतिनिधी :- योगेश कडस्कर)-येथिल श्री सिध्दीविनायक ना.सह.पतसंस्था आपला 21 वा.वर्धापनदिन रविवार दि.26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखदारपणे साजरा करत असुन त्यानिमीत्त शनिवार दि.25 रोजी सकाळी 10 ते 1 रक्तदान शिबीर साईसुपर मार्कैट,मेनरोड,श्रीरामपूर येथे आयोजित केलेले आहे,या शिबारात जास्तित जास्त संख्यने रक्तदात्याने रक्तदान करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.वासुदेव काळे यांनी केले .तर दि.26 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 स्वयंवर मंगल कार्यालय येथे सर्वरोग निदान शिबीर आयोजित केलेले असुन समाजातील सर्व घटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सुनिल बोलके यांनी केले आहे.सामाजिक दायित्वाच्या भावनेतुन संस्थेने हे उपक्रम आयोजित केल्याची माहिती संस्थेचे सामाजिक प्रकल्प प्रमुख श्री.महेश देशपांडे यांनी सांगीतले.21 वर्षा पासुन संस्था आपल्या वर्धापनदिनाला विवीध समाजोऊपयोगी कार्यक्रम करत असते अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोल जोशी यांनी दिली.युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रिय सहकार वर्ष घोषित केलेले असुन संस्था वर्षभर आपल्या विवीध संस्थाच्या माध्यमातुन विवीध सामाजिक ईपक्रम राबणार आहे.या दोनही उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले असुन कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे संचालक,पदाधिकारी व सर्व सहकारी विशेष प्रयत्नशिल आहेत.
0 टिप्पण्या