श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ८ वी पुण्यतिथी साजरी

राजुरी( प्रतिनिधी योगेश कडसकर) :- राहाता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयात लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील यांची ८वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. मारुती पा. गोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा बँकेचे संचालक श्री अँड काकासाहेब गोरे पा. व उपसरंच डॉ सोमनाथ गोरे होते. प्रारंभी अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री डॉ. बाळासाहेब विखे पा. यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत आणि प्रस्थविक प्राचार्य श्री शेख सर यांनी केले यावेळी कलाशिक्षिका कू. भूमिका तरकासे मॅडम यांनी या वेळी डॉ बाळासाहेब विखे पाटील छायाचित्र रेखाटन करून रेखाचित्र विद्यालयास भेट दिली. उपसरंच डॉ. सोमनाथ गोरे पा. यांनी पद्मश्री विखे पा. व पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पा. यांची प्रतिमा भेट दिली. याप्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी कू.पठारे सृष्टी किशोर, कू भक्ती कसाब, कू. नव्या म्हसे यांनी मनोगत व्यक्त केले तर शिक्षक श्री सुहास धावणे यांनी पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पा यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अँड काकासाहेब गोरे, डॉ. सोमनाथ गोरे यांची भाषणे झाली अध्क्षयीय मनोगत श्री. मारुती पा. गोरे यांनी मांडले तर आभार श्री बबन शेंडगे यांनी मांडले.पद्मूषण डॉ बाळासाहेब विखे पा पुण्यतिथी निमत्त विद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी विकास सोसायटीचे चेअरमन श्री. सुधीर गोरे माजी सरपंच तुकाराम गोरे, श्री हैशिराम गोरे, श्री चांगदेव भालेराव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुहास धावणे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा. प्राचार्य श्री. मुस्ताक शेख पर्यवेक्षक देवराम भांगरे यांच्या मार्गर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख कल्पना नेहे, श्री बबन सातकर, श्री बबन शेंडगे, श्री बाळासहेब घोरपडे सर, सै दिवे, श्री एकनाथ राऊत, श्रीमती सुनीता शेळके, भारती लोखंडे, श्रीमती त्रीवेणी धुळसेंदर, श्रीमती सुनीता पवार, श्रीमती पल्लवी कोकणे, श्री संजय कोरडे आदींनी प्रयत्न केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या