बोरावकेंच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्धव महाराजांचे कीर्तन

 बोरावकेंच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्धव महाराजांचे कीर्तन 





श्रीरामपूर : 


येथील हुंडेकरी वाहतूक व्यवसायातील प्रतिष्ठित नाव म्हणजे वसंतराव उर्फ दादासाहेब बोरावके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी शहरातील गुजराथी मंगल कार्यालय येथे नेवासे येथील उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीत दादासाहेब बोरावके यांचा सिंहाचा वाटा आहे ,त्यांच्यामुळे अनेकांचे प्रपंच उभे राहिले आहेत त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबीयांच्या वतीने हा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे तरी या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन विलास बोरावके, राजेंद्र बोरावके यांच्यासह बोरावके परिवारातील सदस्यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या