शिंगवे येथे प्रथमच निघाली डीजे वर वाजत गाजत अंत्ययात्रा
शिर्डी :
सहसा डिजे किंवा बॅन्ड हे वाद्य दुखःद प्रसंगी वाजवले जात नाही परंतू या परंपरेला फाटा देत ज्या बापाने आयुष्य भर अपार कष्ट करून आपले आदर्श पिढी घडवली त्याबरोबरच समाजाला दिशा दिली अशा बापाचे पांग फेडण्यासाठी बेट्याने गावातून वाजत गाजत काढलेली अंत्ययात्रा पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
दि .१८ एप्रिल ला सायंकाळी पाच वाजता निघालेली अंत्ययात्रा ती ही डीजे च्या तालावर, तथागत भगवान गौतम बुद्ध, व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावरील मंजूळ गितांचा स्वर त्यामागे सजवलेल्या सुगती रथात अशोकचक्राच्या निळ्या ध्वजात लपेटलेला मृतदेह तेथेही बुद्धं शरणं गच्छामी नामस्वर तर त्यापुढे ताटात मेनबत्ती, अगरबत्ती, पाण्याने भरलेला कलश हातात घेऊन जड अंतःकरणाने संथगतीने चाललेला मुलगा व सोबतीला पुज्य भंते संघ यांचेसह डीजे च्या वाद्यांसह असा दिड किलोमिटर पायी चालत असलेला जनसमुदायाने अमरधामात प्रवेश केला . पूज्य भंते यांनी विधीवत पूजा करत अग्नीडाग दिलेनंतर स्तब्ध उभे राहत वाहिलेली श्रद्धांजली व त्याच वेळी डीजे ने वाजवलेली जनगणमन या राष्ट्रगिताच्या धुन ने सांगता झालेला अंत्यविधी असा हा आगळा वेगळा अंत्यविधी पार पडला
राहाता तालुक्यातील शिर्डी येथील पत्रकार अशोक दुशिंग यांचे वडील लक्ष्मणराव दुशिंग यांचे नुकतेच वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले . त्यांनी माझे निधन झाल्यानंतर कोणतेही कर्मकांड न करता दुःख व्यक्त करू नये हि त्यांची इच्छा व्यक्त केली होती हि वडीलांची इच्छा पुर्ण करण्यासाठी अशोक दुशिंग यांनी हा अंत्यविधी आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिंगवे अमरधाम मधे पार पाडला . यावेळी विधीस समाजातील विविध घटकांतील मान्यवरांसह व राष्ट्र सहयाद्री माध्यम समूहाचे संपादक करण नवले, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे .
0 टिप्पण्या