सहकार भारती, अहिल्यानगर (उ)जिल्हा अध्यक्षपदी-वासुदेव काळे



संगमनेर प्रतिनिधी: सहकार क्षेत्रात देश पातळीवर कार्यरत असणार्‍या सहकार भारती या संस्थेच्या अहिल्यानगर(उ)जिल्हा अध्यक्षपदी श्रीरामपूर येथिल वासुदेव काळे यांच्या निवडीची घोषणा सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख श्री.शरदजी जाधव,संगमनेर येथिल मालपाणी उदयोग समुहाचे संचालक श्री.गिरीशजी मालपाणी यांच्या उपस्थितीत सह विभाग प्रमुख श्री.नानासाहेब वाघमोडे यांनी केली.यावेळी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.महामंत्री म्हणुन संगमनेर येथिल श्री.योगेश उपासनी,संघटन प्रमुख म्हणुन कोल्हार येथिल श्री.अजय नान्नोर यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रम व्यापारी असोसिएशन हाॅल,संगमनेर येथे दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन आपले मनोगत व्यक्त करताना श्री.गिरीशजी मालपाणी यांनी सहकार क्षेत्राकडुन असलेल्या समाजाच्या अपेक्षा व सहकार भारती, सामाजिक संघटना म्हणुन करत असलेल्या कार्याचा गौरवपुर्ण उल्लेख केला.
प्रदेश संघटन प्रमुख,श्री.शरदजी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सहकार भारती मुळे सहकार क्षेत्रातील विवीध प्रश्न सोडवले गेले असुन निस्वाःर्थपणे सामाजिक दायित्व निभावणारी ही संघटना असल्याचे सांगीतले.
जिल्हा कार्यकरिणीत निवड झालेले पदाधिकारी पुढिल प्रमाणे-
 सह सघंटन प्रमुख- श्री.महेंद्र खडके
महिला प्रमुख-योगिता शेलार,सह महिला प्रमुख-सौ.देवयानी जोशी
उपाध्यक्ष-डाॅ.पराग सराफ व श्री.राजेंद्र वाबळे
कोषाध्यक्ष-श्री.दिगंबर कुलकर्णी
सचिव-डाॅ.नितीन चासकर,श्री.किशोर कुलकर्णी
प्रशिक्षण प्रमुख-श्री.ज्ञानेश्वर गायकवाड
संपर्क प्रमुख-श्री.सोमनाथ लोखंडे
कार्यालय प्रमुख-श्री.अनिल कुलकर्णी
प्रसिध्दी प्रमुख-श्री.महेश देशपांडे
सोशल मेडिया प्रमुख-श्री.योगेश कडस्कर.
विवीध प्रकोष्ठ प्रमुख पुढिल प्रमाणे-बॅंक-श्री.प्रकाश कलंत्री
 पतसंस्था-डाॅ.स्वाधिन गाडेकर,पतसंस्था सह-श्री.रविंद्र खटोड
साखर कारखाना-श्री.अशोक ताके
कृषि उत्पन्न समिती-श्री.अभिषेक खंडागळे
विवीध विकास सेवा सोसायटी-श्री.भाऊसाहेब पुजारी
पगारदार पतसंस्था-श्री.सुभाष काळे
हौसिंग सोसायटी-सुजाता मालपाठक
बचतगट-विदया क्षिरसागर
दुध संघ-श्री.विराज भोसले
लेखापरिक्षण-श्री.सुरेश डौले
विधी-एड-राजेंद्र खरे
खादि ग्रामोदय-श्री.प्रेमचंद कुंकुलोळ
अभिनव सेवा-श्री.अभिजीत कुलकर्णी
मल्टिस्टेट-प्रविण आप्रे
कार्यकारिणी सदस्य-श्री.सुनिल बोलके,अरविंद शहाणे,सौ.निशा निर्मळ,श्री.बापूसाहेब टाक,श्री.विशाल नावंदर,श्री.वैभव शहा,श्री.राजेश लाहोटी,डाॅ.मोहसिन तांबोळी,अविनाश सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली.या निवडीच्या वेळी प्रत्येकास मोगर्‍याचे रोप व सहकार उपरणे देवुन सन्मानित करण्यात आले,सुत्रसंचलन सौ.देवयानी जोशी यांनी केले.कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने सहकारातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ.पराग सराफ, श्री.प्रकाश कलंत्री व विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या टिमने मोठे योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या