धिंड काढलेल्या आरोपींकडून गावठी कट्ट्याने दहशत; स्थानिक युवकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला...
श्रीरामपूर: श्रीरामपुरात पुन्हा एकदा गॅंगवारच्या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. धिंड काढण्यात आलेल्या आरोपींकडून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल (गुरुवारी) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोंधवणी परिसरात घडली. सुदैवाने, स्थानिक युवकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. संतप्त जमावाने आरोपीस चोप देत कट्ट्यासह पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंधवणी परिसरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास प्रशांत भांड आणि गणेश उंडे हे दोघे समीर शेख यांच्या किराणा दुकानात गेले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सिगारेट व सोडावाटरच्या बाट डी के आणि ल्या मागितल्या त्यानंतर ते म्हणाले तुझा भाऊ कुठे तुझा भाऊ व भैय्या दाभाडे आम्हाला शिव्या देतो असे म्हणून गावठी कट्टा काढून दुकानदारावर रोखला त्यानंतर परिसरातील तरुण आले त्यांनी आरोपीस पकडले मात्र झटापटीत एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला भांड यास जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले.
या दोन आरोपींनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. इंजेक्शनच्या नशेत असलेल्या या गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांकडून सर्रास बंदुकांचा वापर केला जात असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी तात्काळ धाव घेतली. युवकांनी मोठ्या धैर्याने हस्तक्षेप करत आरोपींचा डाव उधळून लावला. संतप्त जमावाने प्रशांत भांड याला चोप देत त्याच्याकडील गावठी कट्ट्यासह श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, दुसरा आरोपी गणेश उंडे हा पोलिसांच्या तावडीतून फरार होण्यात यशस्वी झाला.
या घटनेमुळे श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बंदुकीच्या जोरावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी गणेश उंडे याचा शोध पोलीस घेत आहेत.
0 टिप्पण्या