पिस्टल लॉक झाल्याने जेधे वाचले
श्रीरामपूर :येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे गोरख जेधे यांच्यावर अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेल्या हुजेब शेख या आरोपींने गोळीबार केला.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ग्रॅज्युएट चहा समोर पिस्टलमधून जेधेवर गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र शेख याचा पिस्टल खाली पडल्याने लॉक झाला व जेधे तेथून पळाल्याने वाचले.
आज दुपारी गोरख जेधे हे आपल्या सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ग्रॅज्युएट चहा येथे उभे असताना, अचानक फरार असलेला आरोपी हुजेब शेख हा एका मोटरसायकलवर आला व त्याने जेधे यांच्यावर पिस्टल मधून गोळीबार केला. शेख याचा निशाणा हुकल्याने जेधे वाचले, दरम्यान शेख याची गाडी त्या ठिकाणी पडली व पिस्टल लॉक झाला त्यामुळे जेधे हे माजी आमदार जयंत ससाणे यांच्या घराकडे पळाले. शेखने जेधेचा पाठलाग केला. पुन्हा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्टन लॉक झाल्याने जेधे या गोळीबारातून बचावले.
शेख याने जेधेवर हल्ला का केला, त्याला कुणी सुपारी दिली का? त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल कुणाची आहे? याचा श्रीरामपूर पोलीस तपास करत आहेत.
0 टिप्पण्या