तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाला राज्यस्तरीय सणाचा दर्जा

 


तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाला राज्यस्तरीय सणाचा दर्जा


धाराशिव : 


तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा राज्य सरकारने ‘राज्यस्तरीय सण’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे हा उत्सव महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या २०२५-२६ सण कॅलेंडरमध्ये अधिकृतपणे समाविष्ट झाला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या प्रस्तावानंतर शासनाने हा निर्णय घेतला.


हा दहा दिवसांचा महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडणार असून दरवर्षीप्रमाणे यावेळीही सुमारे ५० लाख भक्त महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतून तुळजापूरला येण्याची अपेक्षा आहे. देवीच्या आरती, गोंधळी, भारूड, जाखडी नृत्य, भजन अशा पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे.


पर्यटन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. राज्यस्तरीय दर्जा मिळाल्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या