ग्रेटर नोएडा येथे हॉस्टलमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार, MBA विद्यार्थ्याचा मृत्यू

 


नवी दिल्ली

दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथील नॉलेज पार्क परिसरात असलेल्या एका खासगी कॉलेजच्या हॉस्टलमध्ये भीषण घटना घडली आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाने हॉस्टलच्या खोलीतच गोळीबार झाला. या घटनेत MBA पदवीचे शिक्षण घेणारा दीपक कुमार या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर पीजीडीएमचे शिक्षण घेत असलेला देवांश चौहान गंभीर जखमी झाला आहे.

सुरक्षारक्षकांना खोल्या बाहेरून किलबंद असताना आतून आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वॉर्डनच्या मदतीने मागील बाल्कनीतून काच फोडून दरवाजा उघडला. आत प्रवेश केल्यावर दीपक मृत अवस्थेत आढळला आणि देवांश रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसले. जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना घटनेच्या ठिकाणी लायसन्स असलेली रिव्हॉल्वर, चार जिवंत गोळ्या, दोन रिकाम्या गूळ्या, मोबाईल आणि लॅपटॉप सापडले.

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास केला असून, पोलिसांनी सर्व शक्य कोनातून चौकशी सुरू केली आहे. नॉलेज पार्क परिसरात अशी घटना यापूर्वी देखील घडली असून, या विभागात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांची वारंवारिता वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी या परिसरात अधिक सर्तकता बाळगावी अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या