रेल्वेचे आयआरसीटीसी अ‍ॅप आणि वेबसाइट कोलमडली; दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचा मनस्ताप


मुंबई

 दिवाळीच्या धामधुमीत रेल्वे तिकीट बुकिंगसाठी देशभरातील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) अ‍ॅप आणि वेबसाइट शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजल्यापासून कोलमडली असून, तिकीट बुकिंग करणे अशक्य झाले आहे. या तांत्रिक बिघाडामुळे देशभरातील सुमारे ५,८०० पेक्षा जास्त वापरकर्त्यांना त्रास सहन करावा लागला आहे.सकाळी १० वाजता तात्काळ तिकीट बुकिंगसाठी वेबसाइट आणि अ‍ॅपवर प्रचंड लोड पडला, त्यामुळे सर्व्हर क्रॅश झाला. प्रवाशांचा संताप वाढला असून, सोशल मीडियावर #IRCTC, #DiwaliTravel अशा ट्रेंड्सखाली त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी पर्यायी अ‍ॅप्स सारखे Paytm, ConfirmTkt यांचा आधार घेतला, तर काहींनी मेम्स शेअर करून या स्थितीवर उपहास केला.NDTV, Business Standard यांसारख्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे तांत्रिक बिघाड वार्षिक सणासुदीच्या काळात वारंवार घडत असून, रेल्वे प्रशासनाने अद्याप या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही. प्रवाशांनी दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रयत्न केले, पण वेबसाइट नॉट रेस्पॉन्ड करत असल्याने त्यांचा वेळ वाया गेला.रेल्वे अधिकाऱ्यांनी या तांत्रिक बिघाडाबाबत माहिती देताना सांगितले की, लवकरच ही समस्या सोडवली जाईल. मात्र, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. दिवाळीच्या तोंडावर असलेल्या या घटनेमुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढला असून, रेल्वेच्या डिजिटल पायाभूत सुविधांवरही प्रश्नचिह्न उपस्थित झाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या