श्रीरामपूर-येथिल श्री सिध्दीविनायक ना. सहकारी पतसंस्थेची 23 वी अधिमंडळाची वार्षिक सभा उत्साहाच्या व खेळिमेळीच्या वातावरणात अपूर्वा हाॅल येथे पार पडली,यावेळी विवीध सामाजिक उपक्रमाची सुरवात करण्याचा मानस संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री.वासुदेवजी काळे यांनी व्यक्त केला.
वार्षिक सभेच्या विषय पत्रिके वरील विविध विषयांवर सविस्तर विवेचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोलजी जोशी यांनी केले,सर्वच विषयांना सभासदांनी एकमुखी पाठिंबा देवुन मंजुरी दिली,नविन आदर्श उपविधी स्विकारताना काही बदल सभासदांना अपेक्षित आहेत,त्यावर चर्चो झाली.
एनवेळच्या विषयात GST कमी झाल्यामुळे नागरिकांचे जिवनमान उंचावण्यास मदत होणार आहे,खुप वस्तु स्वस्त होत आहेत यासाठी केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव श्री.बापूसाहेब पटारे यांनी मांडला त्याला सभासदांनी टाळ्यांच्या गजरात संमती दिली.
श्री.लक्ष्मण भंडारीसर,श्री.अभिजीत ताके,श्री.शकुरभाई शेख,अजय चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री सिध्दीविनायक पतसंस्था अत्यंत चांगले काम करत असुन सभासदांचे,ठेविदारांचे हित जोपासताना संचालक मंडळ थकित कर्जदांरावर वसुलीसाठी कठोर कारवाई करते या बद्दल अभिनंदन केले.
अध्यक्षिय मनोगतात, श्री.वासुदेवजी काळे यांनी सव्वातास उपस्थितांना सध्याच्या दोलायमान आर्थिक काळाची जाणीव करुन देताना,आपला पैसा आपण आपल्या स्वप्नांसाठी,प्रियजनांसाठी जमा करतो तो गुंतवताना अभ्यासपुर्वक गुंतवाच परंतु अति व्याजाच्या मोहाला बळी पडु नका असे आवाहन केले.
संस्थेच्या चढत्या आलेखाची आकडेवारी सादर करतानाच चांगले व तारणी कर्ज वाटप व 15 पेक्षा जास्त बॅंकामध्ये सुरक्षितपणे 21 कोटी रक्कम गुंतवलेली आहे,संस्थेला सातत्याने लेखापरिक्षणात अ वर्ग मिळत असतो,संस्थेचे कामकाज पारदर्शी व दुरद्रुष्टी ठेवुन चालु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.स्पर्धैच्या युगात आव्हानांना रोज सामारे जावे लागते,यामुळे कामाकाजत लवचिकता ठेवल्यामुळे निर्माण होणार्या संधीचा लाभही
श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवारातील सर्व स्टाॅफ घेतो,आपला स्टाॅफ 24x 7 अविरत सेवेसाठी आनंदाने तयार असतो ही सभासदांसाठी जमेची बाजु आहे.
यावेळी बोलताना श्री.काळे यांनी सभासदानां 12% लाभांश जाहिर करतानाच देणे समाजाचे या भुमिकेतुन सभासंदाच्या घरात एखादया व्यक्तीचे निधन झाले, त्या परिवाराने फोन करुन माहिती दिली तर त्यांचे घरी 20 व्यक्तींपर्यंतचे भोजन संस्थेच्या वतीने मोफत पोहच केले जाणार आहे,तर संस्थेच्या सभासद एकल पालक असेल तर अशा सभासदांच्या कुटुंबातील एका पाल्यासाठी शिष्यवृती सुरु करत असल्याचे त्यांनी सांगतानाच या सामाजिक दायित्वाच्या योजनांची सुरवात येत्या आर्थिक वर्षा पासुन करत असल्याने सभासदांनी देणे समाजाचे म्हणुन या योजनांना आर्थिक हातभार लावावा अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली,याला उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात संमती दिली.
वार्षिक मिटिंगसाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष सभासद उपस्थित होते,व्यासपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सुनिलजी बोलके,संचालक सर्वश्री बाळासाहेब कोकरे,सचिनगुरु जोशी,मनजितसिंग बत्रा,धनंजय हरदास,अनिल शेजुळ,दिलीप महाजनी,सुभाष काळे,विनायक जोशी उपस्थित होते.
स्वागत संचालक श्री.नंदकिशोरजी निर्मळ यांनी केले,तर आभार संचालक श्री.सोमनाथजी लोखंडे यांनी मानले,सुत्रसंचलन DCEO श्री.दिगंबरजी कुलकर्णी यांनी केले,पसायदानाने मिटिंगची सांगता झाली.
0 टिप्पण्या