डॉ. वर्षा पुजारी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांचेकडून Ph.D.पदवी प्रदान
राहाता प्रतिनिधी :राहाता तालुक्यातील ममदापूर येथील सौ. वर्षा प्रमोद म्हसे यांनाभौतिकशास्त्र विषयात संशोधन करून उल्लेखनीय यश संपादन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.डॉ. पुजारी यांनी आपले पदवी शिक्षण बी.एस्सी. ही भौतिकशास्त्र विषयात रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर येथून तर पदव्युत्तर शिक्षण एम.एस्सी. भौतिकशास्त्र विषयात फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले. त्यांनी "Investigation of Properties of Some Rare Earth Substituted M-Type Hexaferrites" या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले असून प्रा. डॉ. सुनील एम. पतंगे (विभागप्रमुख, श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी, धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन सादर केले.संशोधन कार्यकाळात त्यांनी दहा पेक्षा जास्त संशोधन लेख आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. त्यांच्या संशोधन प्रवासात माजी आमदार श्री. भानुदास मुरकुटे (चेअरमन, अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगर), सौ. मंजुश्रीताई मुरकुटे (कार्यकारी अधिकारी, अशोक ग्रामीण शिक्षण संस्था), डॉ. सागर शिरसाठ (न्यू साउथ वेल्स विद्यापीठ, सिडनी, ऑस्ट्रेलिया), डॉ. संतोष जाधव (जिंतूर, परभणी) आणि प्रा. ए. पी. शिंदे (प्राचार्य, अशोक इंजिनीअरिंग कॉलेज, अशोकनगर) यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.या प्रवासात त्यांच्या यशामागे महत्त्वाची भूमिका निभावली ती म्हणजे त्यांचे पती प्रा. प्रमोद म्हसे (सहाय्यक प्राध्यापक, अशोक इंजिनीअरिंग कॉलेज, अशोकनगर) यांची. डॉ. वर्षा पुजारी यांनी आपल्या शोधनिबंधाद्वारे भौतिकशास्त्र क्षेत्रात मोलाचे योगदान नोंदवले असून त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठ, संपूर्ण राहाता व श्रीरामपूर तालुका, विविध अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, नातेवाईक, मित्र परिवार व संबंधित मंडळींकडून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या