शिर्डी
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात तब्बल ₹७० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ४७ जणांविरुद्ध फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घोटाळ्यात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि तपाससंस्थानच्या विद्युत विभागात कामाला असताना काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून विद्युत साहित्याची चोरी आणि बनावट नोंदी (डेड स्टॉक रजिस्टरमध्ये) करून ₹७०,००,००० (सत्तर लाख) रुपयांचा मोठा घोटाळा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यात जुने, निकामी झालेले विद्युत साहित्य परस्पर विकून, त्याची किंमत हडपल्याचा संशय आहे.याप्रकरणी १७ आरोपींविरुद्ध चोरीच्या साहित्याची रक्कम भरण्याची तयारी दाखवली होती; मात्र त्यापैकी १५ आरोपींनी जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. उर्वरित २ आरोपींनी त्यांच्यावरील जबाबदारीचा काही भाग भरला आहे. सर्व ४७ जणांनी केवळ कागदोपत्री चोरी व अपहार केला नसून, त्यांनी फिजिकल (शारीरिक) कार्य करून विद्युत साहित्याची ने-आण व विल्हेवाट लावली आहे.न्यायालयीन आदेशाने गुन्हा दाखलया सर्व प्रकरणांची चौकशी झाल्यानंतर, शिर्डी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार या ४७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सामील असल्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या ४७ आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असून, यात अटकसत्र सुरू होण्याची शक्यता आहे.आरोपींची नावेया गंभीर गुन्ह्यात ज्यांची नावे समाविष्ट आहेत, त्या ४७ आरोपींमध्ये बी. डी. नामदेव रामचंद्र जाधव, बाळासाहेब केशव कदम, वसंत दामोधर गोडके, साहेबराव पांडुरंग लेंढे, अशोक रंगनाथ औटी, रवि भरत सुपे, रघुनाथ भगजी आले, संजय मधुकर औटी, विजय गणपतराव रोहमारे, रोहेंद्र सोपान चव्हाण, प्रकाश नथु आबक, राहुल रतन शेलुंदे, सुनिल काशीनाथ भ्रम, एम. आर. शेख, दिपक शिवाजी तुपके, राजेंद्र भाऊसाहेब बोटले, संजिव निंबाळकर, महेश मुळे, व्यंकटेश औटी, प्रमोद शंकरराव गिते, किशोर तुकाराम महाले, आकाश तुळ, बाबु कुष्णराव कुरकुटे, अरुण गणपत यादव, सयाब बाळासाहेब बारगजे, सागर रमेश जगताप, बाळासाहेब एकनाथ हराळे, शरद बाळासाहेब मोरे, महेश मोरे, सागर कामकर, रामनाथ लक्ष्मण वाकचौरे, सोमनाथ साहेबराव पांढरे, विक्रम सुखदेव देवकर, सुभाष नामदेव लांडे, महेश विठ्ठल गोडके, भानुदास दादा नवले, विलास गणपतराव जुन्नरकर, मंगेश ठाकर, मोहळकर अप्पा काळे, सुनिल कुंडलिक वाघ, विलास रघुनाथ भवार, अनिल नामदेव वांगे, सत्येंद्र मच्छिंद्र मोरे, परशुराम चांगदेव बोरगे, साईनाथ परसराम आव्हाड, योगेश रामचंद्र रोहम यांचा समावेश आहे.

0 टिप्पण्या