नवी दिल्ली : अधिकृत आधार केंद्रांच माहिती आता गुगल मॅपवर पाहायला मिळणार आहे. आता जवळच्या आधार केंद्राचा पत्ता आणि उपलब्ध सेवा गुगल मॅपवर सापडतील. अधिकृत सुमारे 60 हजार आधार केंद्रे गुगल मॅप्सवर प्रदर्शित करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आणि गुगलने भागीदारी केली आहे.
गुगल आणि यूआयडीएआयमधील सहकार्याच्या पुढील टप्प्यात यूआयडीएआय केंद्राची माहिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि लोकांच्या अभिप्रायाला थेट प्रतिसाद देण्यासाठी गुगल व्यवसाय प्रोफाइलचा वापर करेल. भविष्यात, भागिदारी गुग नकाशे इंटरफेसद्वारे थेट अपॉइंटमेंट बुकिंग करता येईल.
आधार केंद्रांकडून ज्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात, त्यानुसार आधार केंद्रांची माहिती गुगल मॅपवर दिसेल. लहान मुलांची नोंदणी, प्रौढ नागरिकांची नोंदणी, फक्त पत्ता अपडेट करणं, मोबाईल क्रमांक अपडेट करणं यानुसार माहिती गुगल मॅपवर दिसेल. दिव्यांगांच्या सोयींची उपलब्धता, इन्फ्रास्ट्रक्चर, पार्किंग सुविधा, कामाचे तास याबाबतची माहिती गॅगल मॅपवर उपलब्ध असेल. याबाबतच्या सुविधा येत्या काही दिवसात गुगल मॅपवर दिसतील.

0 टिप्पण्या