एकूण ३४ आरोपी गजाआड, आणखी कारवाईची शक्यता
जालना, १० फेब्रुवारी : जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात २०२२ ते २०२४ या काळातील अतिवृष्टी, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या अनुदानात तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रथम २२ तलाठ्यांसह २८ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून, आर्थिक गुन्हे शाखेने अटकांचा सिलसिला सुरू केला आहे. आतापर्यंत ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि आणखी काही आरोपींना लवकरच बेड्या ठोकण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घोटाळ्याचा प्रकार कसा झाला?
अंबड व घनसावंगी तालुक्यातील २४० गावांमधील शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम बोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर, नातेवाईकांच्या खात्यावर किंवा थेट काही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. बनावट दस्तऐवज तयार करून संगणक प्रणालीचा गैरवापर करत ही रक्कम हडप करण्यात आली. खरा शेतकरी, ज्याचे खरोखरच पिकांचे नुकसान झाले होते, तो पैशांपासून पूर्णपणे वंचित राहिला. यामुळे जिल्हाभरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
कोण-कोण अडकले?
अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात (सीआर नं. ४५३/२०२५) खालील आरोपींचा समावेश आहे :
अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि घनसावंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. अद्याप त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही, पण चौकशीत त्यांचाही सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत. आणखी काही वरिष्ठ अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शेतकऱ्यांचा संताप, प्रशासनाची जबाबदारी
“आमच्या रक्त-पसीने कमावलेल्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी आलेला पैसा तलाठी-कर्मचारीच लुटून नेले. हे शेतकऱ्यांचे रक्त चोखणं आहे,” असे म्हणत पीडित शेतकरी आक्रोश व्यक्त करत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकरण गंभीर घेत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.आता काय?

- २२ तलाठी (गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाणे, शिवाजी ढलके, कल्याण बामनावत, सुनील सोरमारे, मोहित गोषिक, चंद्रकांत खिल्लारे, रामेश्वर जाधव, डिगंबर कुरेवाड, किरण जाधव, रमेश कांबळे, सुकन्या गवते, कृष्णा मुलगुले, विजय जोगदंड, निवास जाधव, विनोद ठाकरे, प्रवीण शिंगारे, बप्पासाहेब भुसारे, सुरज बिक्कड इ.)
- सहायक महसूल अधिकारी सुशील जाधव, नेटवर्क इंजिनिअर वैभव आडगांवकर, तत्कालीन संगणक परिचालक विजय भांडवले, महसूल सेवक रामेश्वर बारहाते, महसूल सहायक आशिष पैठणकर, दिनेश बेराड इ.
अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि घनसावंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. अद्याप त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही, पण चौकशीत त्यांचाही सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत. आणखी काही वरिष्ठ अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शेतकऱ्यांचा संताप, प्रशासनाची जबाबदारी
“आमच्या रक्त-पसीने कमावलेल्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी आलेला पैसा तलाठी-कर्मचारीच लुटून नेले. हे शेतकऱ्यांचे रक्त चोखणं आहे,” असे म्हणत पीडित शेतकरी आक्रोश व्यक्त करत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकरण गंभीर घेत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.आता काय?
- सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात येत आहे.
- हडप केलेली रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू.
- आणखी एजंट आणि बोगस लाभार्थ्यांची चौकशी होणार.

0 टिप्पण्या