अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन ऐनवेळी कुणी बदलवला?

 👆 अजित पवारांचा विमान अपघात हा घातपात.. 
 पुतणे आमदार रोहित पवार यांना संशय...



मुंबई : राष्ट्र सह्याद्री : 

 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमाना अपघाताबाबत व्हिडिओ प्रेझेंटेशन द्वारे आमदार रोहित पवार यांनी दहा प्रश्न उपस्थित केले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विदेशी तपास यंत्रणा द्वारे या संशयित घातपाताचा तपास करण्याची मागणी केली...

 पाहूया रोहित पवार यांनी कुठले प्रश्न उपस्थित केलेत... 👉

 रोहित पवार यांची व्हिडिओ कॉन्फरन्स 

तपास यंत्रणांची बोलती बंद करणारे आ. रोहित पवारांचे 10 सवाल : 


१. दादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन ऐनवेळी कुणी बदलवला?

२. ज्या विमानात ते बसणार होते, त्याचे पायलट आणि को-पायलट ऐनवेळी का बदलले गेले?


३. दुसरा गो-अराउंड का घेतला नाही? कंपनीने इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का?


४. विमान एका बाजूला कलले, मेकॅनिकल फेल्युअर झालं का?


५. टेकऑफपूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? टेकलॉग, एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहेत?


६. रूटिन मेंटेनन्स कोणी केलं? हँगर्स सीसीटीव्ही फुटेज कुठे?


७. हेव्ही मेंटेनन्सचा अहवाल कुठे?


८. व्हीएसआर कंपनीच्या विमानावर युरोपमध्ये बंदी आहे, भारतात का नाही?


९. दोन वर्षांपूर्वी व्हीएसआर चा अपघात झाला, रिपोर्ट दाबला गेला का?


१०. पायलट सुमीत कपूरवर तीन वर्षे दारू पिण्याची बंदी होती, तरी व्हीआयपी विमान चालवण्याची परवानगी कशी?आ. रोहित यांनी सांगितलं की, विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती, खालच्या उंचीवरून उडताना ईजीपीडब्ल्यूएस अलर्ट का आला नाही, ट्रान्सपाँडर का बंद होता, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या