शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तर्फे शिवजयंती निमित्त जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा

श्रीरामपूर शिवजयंतीनिमित्त शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलतर्फे 'जय शिवाजी, जय भारत' मेगा पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय होमिओपॅथीक आयोग यांच्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. पदयात्रेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. शांतीमलजी जबाहरमलजी पाटणी विद्यालयापासून सुरू झालेली पदयात्रा महात्मा गांधी चौक, गिरमे चौक मार्गे शिवाजी रोडपर्यंत काढण्यात आली,

ढोल-लेझीम पथक, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनींच्या लेझीम रिंगणामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप दादा पवार (संचालक, शिवा ट्रस्ट) होते. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, प्राचार्य दीपक शिरसाठ, सरपंच सचिन पवार यांच्यासह पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. रिझवान अहमद, पूनम बोधक, प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पदयात्रेनंतर महाविद्यालयाच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य बॅनर प्रदर्शित करण्यात आले.सदर पदयात्रेत डॉ. निलेश सदावर्ते डॉ. जेठलीया विपिन, डॉ. पागिरे संगीता, डॉ. विद्या दहे, डॉ. दर्शनी साबळे, डॉ. भगीरथ जाधव, डॉ. बी. हरिश्चंद्रे, डॉ. अनिता आगळे, डॉ. अभय पानसंबळ, डॉ. पौर्णिमा कळमकर, डॉ. रियाज पटेल, डॉ. आशिष जैस्वाल, डॉ. प्रतिमा सोनवणे, डॉ. विजय पवार, डॉ. कळमकर प्रदीप, डॉ. रेखा पारखे, डॉ. प्राची आंबेकर, सारिका घेर्डे, डॉ. सुरेज थोरात, डॉ. शुभांगी केदार, डॉ. मुनझ्झा शेख, डॉ. महेश कोकाटे, डॉ. पियुष आचलिया, डॉ. समर रणशिंग, डॉ. अमोल म्हस्के, डॉ. लता सगळगिळे, डॉ. प्राजक्ता नागर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी,रमेश तांदळे, सुधीर महापूरे, 
संकेत विधाटे, तुकाराम सुर्यवंशी विद्यालयाचे विदयार्थी देखील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या