श्रीरामपूर-श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवार,श्री महालक्ष्मी महिला पतसंस्था परिवार यांच्या सहकार्याने आई उदयोजकता निर्मिती(स्टार्टअप)केंद्र,श्रीरामपूर यांनी विशिष्ठ महिलांचा सन्मान समारंभ अपुर्वा हाॅल येथे आयोजित केला होता,या कार्यक्रमाला महिलांनी दिलेला प्रतिसाद,प्रचंड उपस्थिती आम्हाला आपणापुढे नतमस्तक करणारा आहे असे प्रतिपादन आईचे संस्थापक व श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवाराचे कुटुंब प्रमुख वासुदेव काळे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील 51 अशा महिलांचा सन्मान आई महिला उदयोजकता निर्मिती केंद्राने आयोजित केला होता ज्यांनी पतीच्या माघे आपले कुटुंब सावरले,मुलांना घडवले,सामाजिक दायित्वही निभावले,तर काही अशाही महिला होत्या ज्यांना दुर्धैर आजाराने घेरले होते,परंतु प्रचंड इच्छा शक्ती व भगवंताची कृपा यामुळे त्या लढल्या व जिंकल्याही!
अशा नवदुर्गांचा सन्मान करताना आम्ही कृतकृत झालो अशी भावना व्यक्त करतानाच श्री.वासुदेव काळे यांनी आईच्या माध्यमातुन त्यानां उदयोग उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर श्री.सुनिल बोलके,श्री.सोमनाथ लोखंडे,सौ.विदया काळे,सौ.बत्रा,नगरसेवक दिलीप नागरे,उदयोजक प्रविण बोरा,विमा सल्लागार नितीन चित्ते यासह विवीध मान्यवर उपस्थित होते.
सन्माना नंतर बहुसंख्य महिलांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रु अनावर झाले होते,या माता भगिणींनी आपल्या मनोगतातुन श्री सिध्दीविनायक परिवाराला व आई उदयोजकता निर्मिती केंद्राला भरभरुन आशिर्वाद देताना असा सन्मान असा आदर आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच मिळाला असे भावनिक मनोगत व्यक्त केले.
एक एका महिलांचे आयुष्य म्हणजे एक चित्रपट असल्यासारखे याक्षणी उपस्थिताना जाणवत होते,या कार्यक्रमातील उपस्थित महिलाही भावनावश झाल्या होत्या.
कार्यक्रमात स्वागत सौ.विदया काळे यांनी केले तर प्रास्ताविक करताना श्री.नंदकिशोर निर्मळ यांनी श्री सिध्दीविनायक परिवारातील सर्व संस्थाच्या कामाचा आलेख सर्वांसमोर मांडला.मान्यवरांच्या हस्ते सर्व महिलांना सन्मानपत्र देवुन गौरवण्यात आले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील महिला,श्री सिध्दीविनायक परिवारातील सर्व संस्थाचे संचालक यावेळी उपस्थित होते,आभार सौ.पुजा कदम यांनी मांडले,सुत्रसंचलन श्री.दिगंबर कुलकर्णी,सौ.सविता शिंदे,सौ.अनिता गायकवाड यांनी केले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सिध्दिविनायक पतसंस्था परिवारतील सर्व स्टाफने बहुमुल्य योगदान दिले.
0 टिप्पण्या