🚨 BREAKING: जामखेडमध्ये गँगवॉरचा भडका! कुख्यात गुंड सागर मोहळकरवर भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार

 


कुख्यात गुंड निलेश घायवळवर भर मैदानात हल्ला करणारा सागर मोहोळकर कोण?

 समोर आला भयंकर गुन्हेगारी इतिहास!



पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला धाराशिवमध्ये एका तरुणाने भर कुस्तीच्या मैदानात कानाखाली लगावल्याचा प्रकार घडला होता, आता या हल्लेखोर तरुणावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. स्वतःच्या गावात राहत्या गल्लीत त्याच्यावर सात राऊंड फायर करण्यात आले. त्यातील चार गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या.  सागर मोहोळकर असे या गुन्हेगार तरुणाचे नाव. सागर मोहोळकर याचा धक्कादायक गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. 

कुस्तीच्या आखाड्यात झालेली ही झटापट केवळ किरकोळ वाद नसून त्यामागे मोठे गुन्हेगारी कनेक्शन असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.



धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरुड येथे ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्तीचा फड भरवण्यात आला होता. या कार्यक्रमाला पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ उपस्थित होता. तो पैलवानांची भेट घेण्यासाठी मैदानात उतरला असताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा पैलवान सागर मोहोळकर याने गर्दीतून येत थेट घायवळच्या कानाखाली लगावली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मैदानात एकच खळबळ उडाली. घायवळच्या समर्थकांनी मोहोळकरला तिथेच चोप दिला, मात्र तो तिथून निसटण्यात यशस्वी झाला होता.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सागर मोहोळकरबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे:

  • दोन खुनांचे गुन्हे: सागर मोहोळकर हा केवळ पैलवान नसून त्याच्यावर यापूर्वीच दोन खुनांचे (Murder) गुन्हे दाखल आहेत.
  • तुरुंगातही राडा: एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तिथेही एका कैद्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.
  • पक्का गुन्हेगार: तो कुस्तीच्या फडासोबतच गुन्हेगारी क्षेत्रातही 'पक्का खेळाडू' असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

निलेश 'ड्रायव्हर' की घायवळ? वादाचे मूळ काय?

पुण्यातील गुन्हेगारी विश्वात निलेश घायवळ (ज्याला अनेकजण घायवळ टोळीचा प्रमुख म्हणून ओळखतात) आणि सागर मोहोळकर यांच्यात झालेला हा वाद पूर्ववैमनस्यातून होता की वर्चस्वाच्या लढाईतून, याचा तपास वाशी पोलीस करत आहेत. निलेश घायवळ हा स्वतः एका मोठ्या टोळीचा प्रमुख असून त्याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका पैलवानाने थेट त्याच्यावर हात टाकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या