CRIME : राहाता बसस्थानकात चालक, वाहकाला पोलिसांकडून मारहाण


राहाता पोलिसांना शिविगाळ परत ॲट्रॉसिटीची धमकी  
 येवला येथील हेड कॉन्स्टेबलसह चौघांवर गुन्हा दाखल


 राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी अशोक दुशिंग...

शिर्डी : उदगीर बस डेपो चे कर्मचारी राहाता बसस्थानकात आपली बस घेऊन आले असता तेथे उपस्थित असलेल्या येवला येथील पोलीस हेडकॉन्स्टेबलसह तिघांनी बस चालक व वाहकाशी हुज्जत घालत त्यांना जबरी मारहाण केली. राहाता पोलीसांनाही शिवीगाळ केल्याने याप्रकारणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेचे सुमारास फिर्यादी चालक विकास बालाजी मुंढे असे त्याचे ताब्यातील एस टी बसक्रमांक एम एच २४ ए यु ७९७० ही घेवुन राहाता बसस्थानक येथे आले असता नाशिक जिल्ह्यातील येवला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोहेकों फकिरा तोताराम थोरात, सार्थक संजय बनसोडे (रा साकुरी ता राहाता) यांनी फिर्यादी चालक विकास मुंढे यांना शिविगाळ, दमबाजी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच फोन करुन त्यांचे इतर दोन साथिदार यांना बोलावुन घेवुन त्याच्याबरोबर मिळुन पुन्हा मारहाण केली.

 सदर मारहाणीत चालक विकास मुंडे यांचा सरकारी गणवेशाचा खिसा फाडलेला आहे. सदर मारहाणीत फिर्यादी व चालक विकास मुंडे यांना मार लागला आहे. तसेच पोलीसांना देखिल शिवीगाळ दमबाजी केलेली आहे. तसेच मी पोलीस आहे, तुमच्यावर तसेच पोलीस उपनिरिक्षक लेंडे व पोलीस ठाणे अंमलदार बर्डे यांना म्हणाला की "मी तुम्हाला सर्वांना कामाला लावुन टाकेल व तुमच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली"

 फिर्यादी हे शासकीय कर्तव्य पार पाडत असतांना अडथळा निर्माण केल्याच्या फिर्यादीवरुन पोहेकों फकिरा तोताराम थोरात, सार्थक संजय बनसोडे व इतर दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १३२, 1 १२१( १), ३५१(२), ३५२व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कुमावत या करत आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या