Police Action : शिर्डीत २५ लाखांचा मांगूर मासा पकडला..!

 

 स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई 


 राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी अशोक दुशिंग...

शिर्डी : केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेला सुमारे ४००० किलो मांगुर मासा जप्त करण्यात आला असून, ट्रकसह एकूण २९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


 अहिल्या नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. दिपक मेढे व त्यांच्या पथकाने शिर्डी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला.दिनांक ३मार्च रोजी निमगाव बायपास रोड, नगर-मनमाड महामार्ग येथे ट्रक क्रमांक WB25M5023 ताब्यात घेण्यात आला. 

ट्रकमध्ये प्रतिबंधित मागुर मासा आढळून आला. ट्रकमधील चार आरोपींनी सदर मासा पश्चिम बंगाल येथून भरून खोपोली-मुंबई येथे नेण्याची कबुली दिली.

त्यानंतर ट्रक शिर्डी पोलीस ठाणे येथे आणून मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांनी पाहणी केली असता, तो मासा केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या आफ्रिकन मागुर जातीचा असल्याचे स्पष्ट केले.

 जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष ब्लिचिंग पावडर व मीठ टाकून जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले.

स्वपन नियम डे (वय ३६) मकबुल रौफ सरदार (वय ३१) कुतुब आयुब मंडल (वय ३५) मृत्युंजय मुकुल विश्वास (वय २७) तर मिराज (प. बंगाल) व इमाम भाई (मुंबई) हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सदर कामगिरी पोउपनि. दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके पोलीस अंमलदार शाहिद शेख, पोलीस अंमलदार फुरकान शेख, पोलीस अंमलदार राहुल डोके, पोलीस अंमलदार सुनिल मालणकर, पोलीस अंमलदार प्रशांत राठोड, पोलीस अंमलदार सतिष भवर,चालक उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांनी केली. त्यांना शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि. सागर काळे यांनी सहकार्य केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या