भरधाव डंपरचा घरात शिरला ; वृद्ध महिला गंभीर जखमी

 


संगमनेर  : 

       घुलेवाडी ते समनापूर रस्त्यावर सुकेवाडी शिवारामध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला. डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव डंपर थेट शेतातून जात घरात घुसला. या अपघातात सत्यभामा लहानु सातपुते (वय ७०) या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.

      घुलेवाडीहून समनापूरच्या दिशेने जाणारा डंपर (क्रमांक MH 17-6847) अचानक चालकाचा वाहना वरील ताबा सुटला अन डंपर थेट रस्त्यालगत असलेल्या पपईच्या शेतातून सुकेवाडी येथील रामनाथ लहानु सातपुते यांच्या शेतातील घरावर आदळला. घराची भिंत तोडून डंपर थेट घरात शिरला.या वेळी घरासमोर बसलेल्या सत्यभामाबाई सातपुते या डंपरखाली सापडल्या. त्यांच्या हातावरून डंपर गेल्याने हात गंभीर जखमी झाली आहे. अपघाता नंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत महिलेला बाहेर काढले व पुढील उपचारासाठी ‘मेडिकेव्हर’ या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

    भरधाव व ओव्हरलोड वाहनांमुळे वाढते अपघात वाळू तस्करी, मुरूम वाहतूक करणारी तसेच ओव्हरलोड ट्रक भरधाव वेगाने धावत असल्या च्या तक्रारी वारंवार समोर येत आहे. त्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत असून नागरिकांमध्ये तीव्रनाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या