श्रीरामपूर: 'कोटा गार्डन' पार्किंगमध्ये वाहनांच्या बेशिस्त रांगा; नागरिक आणि अधिकाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन?
शहरातील प्रसिद्ध 'कोटा गार्डन' परिसरातील पार्किंगमध्ये सध्या बेशिस्त पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी येणारे नागरिक आणि काही शासकीय अधिकारी आपली वाहने अस्ताव्यस्त उभी करत असल्याचे चित्र दिसत आहे.फोर व्हीलर वाले चालक आपल्या गाडीचे काचा ब्लॅक करतात आत मधलं नाही दिसावं म्हणून गाडी ऑप्शन काळी खिडकी येल्ला परवांगी आहे का प्रशासन येकडे दुर्लक्ष्य करता का काही दिवसापासून कोर्टासमोर दोन तीन तास काही स्विफ्ट कार उभ्या राहतात त्यांना नंबर प्लेटत नसतात गाडीचे काचा ब्लॅक विंडो राहतात यावर प्रशासनाचे दुर्लक्ष व नागरिकांना गाड्या पार्किंग करायला जागाच नसतात हा फोर व्हीलर वाल्यांचा माज आहे का गाडीला नंबर प्लेट पण नाही व गाडीला ब्लॅक विंडो प्रशासनाचा हा अपमान आहे यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करावी किंवा अशा व्यक्तींना योग्य तो दंड आकारावा भारताच्या प्रत्येक नागरिकाला कायदा समान आहे याची जाणीव प्रत्येक नागरिकाला हवी पाहिजे विनाकारण आपल्या पैशाचा माज दाखवणे व बेकायदेशीर पद्धतीने बिना नंबर प्लेटच्या गाड्या वापरणे हे चुकीचे आहे यावर (ट्राफिक पोलीस) प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
विशेष म्हणजे, काही वाहनांच्या नंबर प्लेट्स देखील नियमानुसार नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बागेत येणाऱ्या इतर पर्यटकांना आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विनापरवाना किंवा चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाड्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
0 टिप्पण्या