ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा हे ज्येष्ठांच्या समस्या निवारणाची केंद्र प्राचार्य शंकरराव अनारसे
शिरसगाव-(वार्ताहर )श्रीरामपूर येथील ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा यांच्या माहे एप्रिल महिन्याच्या मासिक सभेत प्राचार्य अनारसे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आजची ज्येष्ठ मंडळी ही अनेक व्याधीने अनेक प्रकारच्या समस्याने पूर्णपणे ग्रासून गेलेली आहे तसेच घरादारात ज्येष्ठांना आज पूर्वीप्रमाणे मान मिळत नसल्याने ते एकाकी होत आहे अशा बेस्टसाठी आनंद मेळावा ही संस्था आठवण ठेवून केलेले वाढदिवसाचे सत्कार हे खूप मोठा आनंद ज्येष्ठना देऊन जातात कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेविनभोसले यांनी केले यानंतर नेहमीप्रमाणे प्रार्थना व गुरुवंदना प्राचार्य अनारसे यांनी म्हटले त्यानंतर श्रीराम बोबडे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले व इतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली यानंतर पठाण भाऊसाहेब यांनी इतिवृत्त वाचन व जमा खर्च मांडून त्यास मंजुरी घेण्यात आली प्राचार्य शेळके याप्रसंगी म्हणाले आपण जीवन जगतो या धकाधकीच्या जीवनात व मोबाईलच्या आगमनाने संवाद तुटत चालला आहे हा संवाद जुळवण्याचे काम आनंद मेळाव्याच्या रूपाने होते प्राध्यापक सुभाष लिंगायत यांनी आपल्या मनोगत ज्या सभासदांचे वाढदिवस साजरे झाले त्यांना शुभेच्छा दिल्या जीवनात वाढदिवसाला खूप महत्त्व आहे आपण कसे जीवन जगलो याचा आढावा जीवनातील बरे वाईट प्रसंग तसेच त्यातून जेष्ठनी केलेली वाटचाल आणि आजची स्थिती याचा आढावा घेतल्यानंतर प्रत्येक ज्येष्ठला एक नवीन उभारी प्राप्त होते
या निमित्ताने घेतला जातो जेष्ठ यांचे वाढदिवस साजरी करताना एकमेकाचा संवाद एकमेकाचा अनुभव तसेच यानिमित्ताने सुसंवाद साधला गेल्याने पुढील आयुष्यात जीवन जगण्याची एक प्रेरणा मिळते अध्यक्षीय भाषणात निकम यांनी जेष्ठ नागरिकांना मेळावा अधिक मासानिमित्त पंढरपूर येथे एक दिवशी सहल घेण्याचा मानस व्यक्त केला तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा च्या सभासदांच्या वतीने भजन संध्या घेण्यात येईल याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याची ज्या सभासदांची वाढदिवस एप्रिल महिन्यात होते अशा बंधू-भगिनींचा स्नेह वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला
याप्रसंगी के पी बोरुडे नंदकुमार निर्मळ प्रवीण साळवे राम बोबडे साहेबराव कपिले बाबा दिघे चिंतामणी भोसले लिहून भोसलेशशिकला शिंदे सुरेखा कासार निर्मला निकम लक्ष्मीबाई राऊत प्रभाताई विधाते प्रभा नाईक राजू पाटीलअब्दुल रज्जाक पठाण सुभाष दळवी आदी मान्यवर हजर होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्राध्यापक सुभाष लिंगायत यांनी केले तर शेवटी चिंतामणी भोसले यांनी आभार मानले व शेवटी सर्व सदस्यांनी अल्पहार घेऊन सभा संपन्न झाली.
प्राध्यापक सुभाष लिंगायत यांनी केले तर शेवटी चिंतामणी भोसले यांनी आभार मानले व शेवटी सर्व सदस्यांनी अल्पहार घेऊन सभा संपन्न झाली.

0 टिप्पण्या