पुरंदर (प्रतिनिधि ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भेट देत महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा यांचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी खंडोबाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील राजकीय स्थैर्य आणि समाजातील शांततेसाठी प्रार्थना केली. साक्षात खंडोबा देवाचा भंडारा (हरिद्र चूर्ण) कपाळाला लावून त्या मनोभावे खंडोबाच्या चरणी लीन झाल्या. जेजुरी गडावर होऊ घातलेल्या रस्त्याने त्यांच्या गाड्यांचा ताफा गडावर पोहोचला, यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बारवाई, श्री मार्तंड देव संस्थानचे अध्यक्ष मंगेश घुणे, प्रख्यात शिल्पकार महिंद्र थोपटे, नगरसेवक योगेश जगताप, समीर मोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुशील राऊत, दादा उबाळे, वैभव कोरफड, गौतम भालेराव आदी उपस्थित होते.
श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने सुप्रिया सुळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. खासदार म्हणून त्या या परिसराचे प्रतिनिधित्व करत असून, Jejuri येथील खंडोबाचे दर्शन त्या नियमितपणे घेत असतात. दरम्यान, त्यांच्या कुटुंबात मंगलकार्य असल्यामुळे कुलदैवताचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी ही भेट दिल्याचे सांगितले जाते. दर्शनानंतर त्यांनी पुढील दौऱ्याला प्रारंभ केला. त्यांच्या या देवदर्शनाची सर्वत्र चर्चा होत असून या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच जेजुरी खंडोबा देवाचे देवदर्शन करण्यासाठी त्या खास आल्याची माहिती नगरसेवक योगेश जगताप यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
Social Icons
नमस्कार, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या वतीने महिलांसाठी हिरकणी महिला मंच हे खुले व्यासपीठ सुरू करण्यात येत आहे. आज पासून या मंचसाठी सदस्य नोंदणी सुरू झाली असून आपल्या तालुक्यात जास्तीत जास्त महिला हिरकणी महिला मंचच्या सदस्य होतील, यासाठी ही लिंक जास्तीत जास्त फॉरवर्ड करा.... 🔺 राष्ट्र सह्याद्री हिरकणी महिला मंचाच्या सदस्यांसाठी... 👉 हळदी कुंकू, लकी ड्रॉ, विविध स्पर्धा, हॉलिडे फन, सहल, कला-कुसर उपक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर वेळोवेळी आयोजित केले जाणार आहेत... सदस्य नोंदणी वार्षिक शुल्क : ₹ 100/- 💁♀ सदस्य नोंदणीसाठी येथे क्लिक करा 👉
0 टिप्पण्या