दोन दिवसात भाजप प्रवेश करण्याची शक्यता
राहुरी : प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये भाजपची ताकद वाढणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र तो मोठा धक्का असेल अशी चर्चा आहे. मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असून त्यांचा दोन दिवसात प्रवेश होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मंगळवारी रात्री दुसरा पर्यंत याबाबत राजकीय चर्चा सुरू होत्या. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असून राहुरी विधानसभा पोट निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना विधान परिषदेचे गिफ्ट दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलले असून डीपीमध्ये जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

0 टिप्पण्या