कवठे येमाई (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या एका मेडिकल दुकानाचे शटर फोडून सुमारे ३० हजार रुपयांची रोकड आणि किरकोळ साहित्य लंपास केले. तसेच चोरट्यांनी परिसरातील एका कपड्याच्या दुकानासह मोबाईल शॉपी फोडण्याचाही प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.ही घटना रात्री २ ते ३ च्या दरम्यान घडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे कवठे येमाई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.थांबून थांबून होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.येथील बसस्थानकासमोरील बाजूस सागर कारंडे यांचे न्यू जयमल्हार मेडिकल स्टोअर असून चोरटयांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करीत ड्रॉवर मध्ये कारंडे यांनी ठेवलेले ३० रुपये व मेडिकल मधील किरकोळ साहित्य लांबवीले.जवळच काही अंतरावर असलेले ऋषिकेश बबन जाधव यांच्या पेशवा या कपड्याच्या दुकानाचे शटर उचकट ले पण शटर ला सेंटर लॉक असल्याने तेथील चोरीचा प्रयत्न यशस्वी झाला. तर प्राथमिक शाळे समोर असणारे कुंडाची मोबाईल शॉपी हे दुकान देखील चोरटयांनी प्रयत्न केला. पण तेथे ही सेंटर लॉक असल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. दरम्यान ही चोरीची घटना आज सकाळी निदर्शनास आली या तिन्ही घटनेत दुकानदारांच्या शटर चे मोठे नुकसान झाल्याचे सागर करंडे,ऋशिकेष जाधव व तेजस दुडे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.होती. शिरूर पोलीस ही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दरम्यान चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शिरूर पंचायत समितीच्या सदस्या कांचनताई राजेश सांडभोर,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोर,सोपं वागदरे सोसायटीचे अध्यक्ष रितेश शहा,अनिल रायकर व परिसरातील व्यापारी नागरिकांनी केली आहे.
कांचनताई सांडभोर म्हणाल्या, "कवठे येमाई परिसरात थांबून थांबून होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि रात्रीची गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी."दरम्यान, या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिस प्रशासनाने तातडीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याची जोरदार मागणी होत आहे.

0 टिप्पण्या