डॉ. प्रमोद म्हसे यांना भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान

भौतिकशास्त्र विषयातील संशोधनाला यश – पीएच.डी. कार्यकाळात २० पेक्षा अधिक संशोधन निबंधांचे जागतिक स्तरावर प्रकाशन

भौतिकशास्त्र विषयातील संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून डॉ. प्रमोद म्हसे यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी "मॅग्नेटोइलेक्ट्रिक इन्वेस्टीगेशन ऑफ हेक्साफेराइट - पेरोवस्काइट स्ट्रकचर्ड कम्पोझिट" या विषयावर यशस्वीरीत्या संशोधन पूर्ण करून आपला शोधनिबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सादर केला.
डॉ. प्रमोद म्हसे यांनी आपल्या संशोधन कार्यादरम्यान संबंधित विषयावर विविध जागतिक दर्जाच्या नियतकालिकांमध्ये ४ संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत. तसेच संपूर्ण पीएच.डी. कार्यकाळात त्यांनी २० पेक्षा अधिक संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय व जागतिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध करून संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. हे संशोधन कार्य त्यांनी डॉ. सुनील एम. पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. संशोधन कार्यादरम्यान त्यांना डॉ. सागर शिरसाठ, डॉ. संतोष जाधव, डॉ. सोपान राठोड आणि डॉ. परेश मोरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संशोधन प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. डॉ. वर्षा पुजारी (म्हसे) यांची त्यांना सातत्यपूर्ण साथ व प्रोत्साहन लाभले, ज्यामुळे हे संशोधन यशस्वीपणे पूर्ण होण्यास मोलाची साथ मिळाली. डॉ. प्रमोद म्हसे यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल अशोक सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन मा. आ. भानुदास मुरकुटे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रा. अंजाबापू शिंदे, समन्वयक डॉ. मोहितकुमार गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच म्हसे व पुजारी कुटुंबीयांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या