बेलापूर रेल्वे स्टेशनवर दारू व गांजा पिणाऱ्यांचा अड्डा,




श्रीरामपूर - बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्टेशनवर अनेक अवैध धंदे सुरू आहेत  त्यात मोठ्या प्रमाणावर दारू, गांजा पिणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असते, एखादा प्रवासी रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभा असला तरी पोलीस त्याला कॅमेरेचा धाक दाखवून त्रास देतात. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून या परिसरात सुरू असलेला दारू, गांजा पिणाऱ्यांचा अड्ड्याकडे  रेल्वे पोलीस दुर्लक्ष का करतात, याची विचारणा केली असता "हे तर आम्हाला खबर देतात, कोणी चोरी केली याची माहिती देतात"  पण प्रत्यक्षात आजपर्यंत रेल्वे स्टेशन परिसरात  झालेल्या मोबाईल चोरी, पाकीट चोरी, सामानांची चोरी, महिलांची छेडछाड  आदि संदर्भात एकही माहिती समोर आली नाही,  त्यामुळे बेलापूर (श्रीरामपूर) येथील रेल्वे पोलिसांबद्दल आता संशय व्यक्त केला जात आहे,

प्रत्यक्ष पाहणी केली असता, रेल्वे स्टेशनच्या बाहेर एकही सीसीटीव्ही कॅमेरा दिसत नाही, रेल्वे स्टेशनचे विस्तरीकणाचे काम सुरू आहे, रात्रीच्या वेळेस अनेक भिक्षा मागणारे लोक या ठिकाणी मुक्कामाला असतात, दानशूर लोक जेवण देतात, पूर्वी या ठिकाणी मोटरसायकल स्टॅन्ड होते, रात्रीच्या वेळी हे ठिकाण गुन्हेगाराचा अड्डा बनला होता. अंधार पडल्यानंतर या परिसरात गुन्हेगारांसह  गांजा व दारू पिणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, अनेक वेळा याच गर्दीतून रेल्वे पोलीस वाट काढत बाहेर पडतात परंतु नशा करणाऱ्या एकाही व्यक्तीची  पोलिसांनी कधी विचारपूस केली नाही, रेल्वे स्टेशन वरील मालधक्का येथून अनेक वेळा चोऱ्या झालेले आहेत, रेल्वेचे भंगार चोरीला गेलेले आहेत परंतु आशा चोरीबद्दल रेल्वे पोलिसांनी कारवाई केली नाही, यातून रेल्वे पोलीस व गुन्हेगार यांचे आर्थिक संबंध उघड असल्याचे बोलले जाते, बेलापूर रेल्वे स्टेशन हे दौंड मनमाड मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे, त्यासाठी कार्यक्षम पोलिसांची गरज आहे, वरिष्ठांनी दखल घ्यावी,  गुन्हेगारांशी संबंध असलेल्या पोलिसावर कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे     
.....





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या