दै. राष्ट्र सह्याद्री'च्या बातमीचा दणका, सोशल मीडियावरील जीवघेणी स्टंटबाजी भोवली
घारगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील कुरकुंडी आणि घारगाव शिवार परिसरात केवळ इंस्टाग्रामवर 'लाईक्स' आणि 'फॉलोअर्स' मिळवण्यासाठी पिकअप गाडीद्वारे जीवघेणा थरार करणाऱ्या स्टंटबाजांना 'राष्ट्र सह्याद्री'च्या वृत्ताने चांगलाच दणका दिला आहेत. 'इंस्टाग्रामवर लाईक्सची नशा...!' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची घारगाव पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या 'रील्स विकृती'विरुद्ध पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला असून, दोन व्हिडिओ शूटर्ससह पिकअप चालकाविरुद्ध कठोर कलमांन्वये कारवाई सुरू केली आहे.
(दि.१७ ) जून २०२६ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घारगाव शिवारातील लक्ष्मी हॉटेलजवळ हा सगळा प्रकार घडला होता. पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भाजीपाला घेऊन जाणारी एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप एमएच 16 सीडी 5719 भरधाव वेगात येत होती. उंचावरून कॅमेरा सुरू असल्याचा इशारा मिळताच, या चालकाने चढ-उताराच्या आणि धोकादायक वळणावर गाडी प्रचंड नागमोडी (वाकडे-तिकडे) वळवत नाचवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड होताच अवघ्या काही वेळात १ लाख ३८ हजारहून अधिक लोकांनी तो पाहिला. 'राष्ट्र सह्याद्री'ने या जीवघेण्या प्रकारावर प्रकाश टाकत आरटीओ आणि पोलिसांना या स्टंटबाजीला लगाम घालण्याचे आवाहन केले होते.
घारगाव पोलीस ठाण्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक फौजदार (सफौ) नारायण महादु ढोकरे यांनी सोशल मीडियावरील या व्हिडिओची गंभीर दखल घेत स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, महामार्गाच्या कडेला असलेल्या एका उंच डोंगरावर उभे राहून संशयित आरोपींनी मोबाईलवरून हे व्हिडिओ शूटिंग केल्याचे समोर आले. पिकअप चालकाच्या सांगण्यावरूनच त्यांनी हे कृत्य केले होते. याप्रकरणी पोलिसांनी रोहित सोमनाथ वारे, अजय मनोज वायळ (रा. वायळवाडी, घारगाव, ता. संगमनेर) व पिकअप एमएच 16 सीडी 5719 वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
'राष्ट्र सह्याद्री'ने पठार भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या बातमीतून आक्रमकपणे मांडला होता. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी घारगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले असून, महामार्गावर 'रील्स'च्या नावाखाली स्टंट करणाऱ्यांना हा मोठा इशारा मानला जात आहे.
नवीन कायद्याची कडक कलमे लागू
हा परिसर श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येतो. महामार्गावरील वाढती वाहतूक पाहता अशा स्टंटबाजीमुळे मोठा अनर्थ घडू शकला असता. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर केवळ मोटार वाहन कायदाच नाही, तर नवीन भारतीय न्याय संहितेची सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या जीवितास व सुरक्षेला धोका निर्माण करणे, रस्त्यावर अडथळा निर्माण करणे आणि समान हेतूने एकत्र येऊन कृत्य करणे. वेग मर्यादेचे उल्लंघन आणि धोकादायक ड्रायव्हिंग अशी अत्यंत कडक कलमे लावली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळसाहेब दगडू बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विलास नामदेव कोकते करत आहेत.

0 टिप्पण्या