उंदिरगाव : श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील शेतकरी अनिल रोकडे यांच्या गाईला चक्क एकाचवेळी तीन वासरांना जन्म दिल्याने गावात कुतुहलाचा विषय बनला आहे. शक्यतो गाय ही दोन वासराना जन्म देते. पंरतू उंदिरगाव येथे रोकडे यांच्या बिफ्फ जर्सी जातीच्या गाईने सोमवारी तीन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे ते तिन्ही वासरे धाडधाकट आहे. मात्र तीन वासरांना जन्म देण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. गाय दोन्ही वेळेस एकूण पाच लिटर दूध देत असल्याचे सांगत जन्माला आलेल्या तिन्ही वासरांची चांगली वाढ होईल.आमच्या भागात गायीला तिळे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सागितले.

0 टिप्पण्या