शिर्डी : - शिर्डीचा विकास व रोजगार वाढवण्यासाठी साईबाबा संस्थानला विश्वस्त मंडळाची अत्यंत आवश्यकता असून या कुंभमेळापूर्वी साईबाबा संस्थान वर विश्वस्त मंडळ असेल तसेच त्यामध्ये सुशिक्षित आणि समृद्ध लोक असावेत अशी अपेक्षा मा खा डॉ . सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे .
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवेशावर ते म्हणाले की पश्चिम बंगालमधील २० खासदार यांनी एनडीए मध्ये प्रवेश केला आहे ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मानले ते प्रवेश करत आहे त्याप्रमाणे भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत आल्यास त्यांचं स्वागत करण्यात येईल.
डॉ विखे काल आजाराच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शिर्डीत दाखल झाले होते. त्यांनी शिर्डीतील नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत कुंभमेळ्या पूर्वी शिर्डीत विकास कामांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता शिर्डीच्या अनेक समस्यावर भाष्य केले, ते म्हणाले साई संस्थांवर विश्वस्त मंडळ आले पाहिजे. ही शिर्डी ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मागणी आहे. याआधी सलग आचारसंहिता लागल्या होत्या आचारसंहिता चालू असतात. विधान परिषदेनंतर यासाठी मोकळा काळ येईल आचारसंहितेनंतर प्रक्रिया पूर्ण होईल कुंभमेळापूर्वी सक्षम विश्वस्त मंडळ तयार होईल राज्याचे मुख्यमंत्री हा निर्णय घेण्यात सक्षम आहेत.
कुंभमेळ्याचे नियोजन उत्कृष्ट केले पाहिजे. दीड वर्षापासून अनेक विकास कामांची प्रस्ताव न्यायालयात पडून आहे थीम पार्कसाठी ३०कोटी रुपये तसेच अंतर्गत रस्तेसाठी संस्थांननी प्रस्ताव सादर केले आहेत. संस्थांननी आपली जबाबदारी ठराव करून पूर्ण केली आहे. दुर्दैवाने न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळेअभावी विलंब होत असेल तर त्याला पर्याय नाही. त्यासाठी विश्वस्त मंडळ येणे गरजेचे आहे विश्वस्त मंडळ लांबण्याचे कारण काय आणि येण्याचे कारण काय हे लवकरच स्पष्ट होईल.
चर्चेत आलो की पता कट
आपण विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागेल काय अशी विचारणा केली असता ते म्हणाले की राहुरी विधानसभा आली माझे नाव चर्चेत आले विधानपरिषद मध्ये माझा पत्ता कट झाला माझे नाव चर्चेत आणू नका माझे नाव चर्चेत आले की माझा पत्ता कट होतो विखे पाटील परिवाराचा कुठलाही सदस्य गेल्या पंधरा वर्षापासून संस्थांच्या प्रक्रियेत नाही. तरीसुद्धा शिर्डीतील जनता विखे परिवाराच्या विश्वास ठेवून काम करत आहे कुणी आले तरी शिर्डीच्या विकासासाठी काम करावे लागेल .आमचा व्यक्ति दोष नाही .उद्देश एकच आहे शिर्डीचा विकास व्हावा विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी. पद्मभूषण किंवा पद्मविभूषण आले विश्वस्त मंडळावर तर त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्थानला नक्कीच होईल सरकार याबाबत बसून निर्णय घेईल जिल्ह्यात १९ आमदार झाले आता पालकमंत्र्यांसमोर त्यांना निधी कसा द्यायचा याची कसरत होणार आहे .मात्र महायुतीचे १९ आमदार झाल्याने महायुतीची ताकद जिल्ह्यात वाढली आहे
मुख्यमंत्री कोल्हेंना दापतील
विधान परिषदेचे नूतन आमदार कोपरगाव चे विवेक कोल्हे यांनी राहता येथे येऊन विखे परिवारावर तूप डागली होती यावर आज डॉ. सुजय विखे म्हणाले की संघर्ष हा जीवनातला विभाज्य भाग आहे पक्ष एक असला काय आणि दोन घराघरात भांडणे होतात . एक परिवार म्हणून सर्वांनी राहिले पाहिजे . दोन भाऊ किती जरी भांडले तरी वडिलांनी दापल्यानंतर शांत होतात तसे आमचे नेते मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकदा प्रेमाने सांगितले की सगळे शांत बसतील.खाली किती अवसान आणले तरी आमचे नेते फडवणीस यांनी बंद खोलीत सांगितले तर सर्व विषय संपून जातो . आमची भांडणे नाही झाली तर तुमचा टीआरपी कसा वाढणार म्हणून आम्ही बोलत राहतो अशी मुश्किल टिपणी त्यांनी विवेक कोल्हे यांचे नाव घेता न घेता केली.
नगरपालिका रेस्टॉरंट तपासणी करणार
नगर परिषदेच्या वतीने प्रत्येक जण जबाबदारी वाटून प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये चौकशी करून तपासणी करणार आहे . नगरपालिका कार्यक्षेत्रात राहून कारवाई करण्यात येईल सोसायटीच्या माध्यमातून विकले विक्री केलेले पेढेच भाविकांनी घ्यावे. एफडीए कडे यंत्रणा कमी असल्याने कामाला वेग नाही आता नवीन अधिकारी आले आता कारवाई सुरू केली जाईल गुन्हेगारी मुक्त शिर्डी शंभर टक्के पर्यत पोहोचले आहे . शिर्डी भेसळयुक्त होऊ नये यासाठी निश्चित पावले उचलले जातील

0 टिप्पण्या