जोरात गाडी चालवण्याचा जाब विचारल्याने जातीवाचक शिवीगाळ

श्रीरामपूर : जोरात गाडी का चालवितो ? असा जाब विचारणाऱ्या महिलेला तू खालच्या जातीची आहे. असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करण्याचा प्रकार गोंधवणी रोडवर घडला.याप्रकरणी ६ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पुष्या राजू बोरकर, (रा.गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १) या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,(दि.८) जूनला रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यानला  आमच्या घरासमोर माझे नातवंडे खेळत होते. मुलगा साई हा अंगणात उभा होता.त्यावेळी श्रीरामपूरकडून गोंधवणीकडे जाणाऱ्या रोडने पांढऱ्या रंगाची एक चारचाकी वेगाने गेली.त्यामुळे बाहेर खेळणारे नातवंडे घाबरले. 

तेव्हा मुलाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी थांबली नाही.तेव्हा मुलाने गाडीला पाठीमागून दगड मारला.तेव्हा गाडी थोड्या अंतरावर जावून पुन्हा मागे जोरात वळून आली व घरासमोर येवून चालक प्रशांत कहाने व त्याच्यासोबतच्या साथीदारांनी गाडीतून खाली उतरत शिवीगाळ कोणी मारला? असे विचारले. तेव्हा आपण त्याला एवढ्या जोरात गाडी का चालवतो लहान नातवंडे रस्त्यावर खेळतात. 
असे म्हणाल्याचा राग येवून त्याने तुम्ही खालच्या जातीचे आहे असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करण आमच्या नादाला लागला तर एकेकाला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून प्रशांत कहाने, विजू कहाने, संतोष कहाने,दिगंबर कहाने, देविदास कहाने व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या