श्रीरामपूर : तालुक्यातील गोंडेगाव येथील एका विद्यार्थिनीचा काहीतरी 'विषारी पदार्थ' पोटात गेल्याने विद्यार्थिनीचा उपचारदरम्यान मुत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
तिला आधी साखर कामगार रूग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती चितांजनक असल्याने तिला आहिल्यानगर येथे शासकीय रूग्णालयात दाखल आले. मात्र तिचा उपचार सुरू असताना प्राणज्योत मावळली. मावशीकडे न जाण्याच्या कारणावरून तिने मनात राग धरून हे शेवटचे पाऊल उचल्याचे बोलले जाते. स्नेहल संजय तांबे (वय १३) असे मुत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहेत.
पीएमश्री जिल्हा परिषद शाळा सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. कु. स्नेहलने नुकताच्या झालेल्या शाळा अतर्गत परिक्षेत उत्तीर्ण होऊन तिने तालुक्याबरोबरच जिल्ह्यात प्रथम पटकाविला. तिची शासकीय महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले. शाळेत अत्यंत हुशार आणि गुणवंत तसेच उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थिनी म्हणून ओळख होती. तिच्या अकाली जन्याने तांबे कुंटूबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिने इतकेच शेवटचे पाऊल का उचलले? हे कारण मात्र समजू शकले नाही.
तिच्या मुत्यू पश्चात आई, वडील, भाऊ, तीन बहिणी, मोठा असा परिवार होता, तांबे कुटूंबात सर्वात धाकटी मुलगी होती. तिच्यावर शनिवारी सांयकाळी अमरधामात शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.याप्रकरणी, तालुका पोलिसात ठाण्यात अकस्मात मुत्यू नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अरूण धनवडे मार्गदर्शनाखाली अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.
0 टिप्पण्या