टाकळीभान ग्रामपंचायत आरक्षण सोडत प्रसंगी गदारोळ

  



वरिष्ठांकडे हरकत नोंदविण्याचे  मंडळाधिकारी रोहिणी आघाव यांचे आवाहन

टाकळीभान ( प्रतिनिधी )- टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकिची प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम  १० जुन रोजी ग्रामपंचायत  ग्रामसचिवालयाच्या सभागृहात अध्यक्ष  अधिकारी मंडालाधिकारी रोहीणी आघाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली परंतु यावेळी प्रभाग ३ व प्रभाग ५ च्या सोडती वरुन पडलेले आरक्षण मान्य नसल्याने सभेत चांगलाच गोंधळ झाला. व काही ग्रामस्थांनी चुकीचे आरक्षण पडल्याने ते मान्य नसल्याचे सांगितले. यावेळी सभा रद्द करण्याची मागणी यावेळी  काही उपस्थितांनी केली. यावेळी मंडळाधिकारी आघाव मॅडम यांनी शासनाच्या जीआर व नियमाप्रमाणे आरक्षण पडले असल्याचे सांगितले. 
               टाकळीभान ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. काल प्रभाग प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम टाकळीभान महसुल मंडळाच्या मंडाळाधिकारी रोहीणी आघाव यांच्या आध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी २०११ च्या लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग क्र. १ मध्ये सर्वसाधारण व्यक्ति, सर्वसाधारण स्ञी, अनु.जाती स्ञी. प्रभाग २ मध्ये नामाप्र पु. सर्वसाधारण पु. सर्वसाधारण स्ञी. प्रभाग क्र. ३ मध्ये अनु. जमाती पु. अनु.  जाती स्ञी, सर्साधारण स्ञी. प्रभाग ४ मध्ये अनु. जाती पु. व सर्वसाधारण पु. प्रभाग ५ मध्ये अनु.जाती पु., नामाप्र स्ञी, सर्वसाधारण स्ञी. प्रभाग ६ मध्ये सर्वसाधारण पु. नामाप्र स्ञी व सर्वसाधारण स्ञी अशी आरक्षण सोडत मंडळाधिकारी आघाव यांनी जाहीर केली. १७ सदस्य संख्या आसलेल्या या ग्रामंचायतीत ९ महीला व ८ पुरुष सदस्य आसणार आहेत. प्रभागातील लोकसंख्येच्या निकषानुसार व आरक्षित प्रभागात ५० टक्याची मर्यादा ठेवुन सर्वसाधारण पु, ४, सर्वसाधारण स्ञी ५, अनु. जाती पु.२, अनु. जाती स्ञी २, नामाप्र पु.१, नामाप्र स्ञी २ तर अनु, जमाती पु. १ जागेवर प्रतिनिधित्व करणार आहे. यापुर्वी झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीत सरपंच पद आनु. जमाती पुरुषासाठी आरक्षित झाले आसल्याने यंदा सरपंच पद प्रभाग ३ ला मिळणार आहे.
या सोडतीवेळी काही प्रभागातील आरक्षणात बदल झाला नसल्याने घडाळाच्या काट्याप्रमाणे प्रभाग आरक्षण करावे अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. याच मुद्यावर काही वेळ चांगलाच गदारोळ झाला. काही विद्यमान सदस्यांची त्या त्या प्रभागात संधी हुकल्याने त्यांचा गोंधळ आणखीनच वाढला. त्यामुळे  आजची प्रभाग आरक्षण सोडत मान्य नसल्याने आजची सभा रद्द करुन पुन्हा आरक्षण सोडत सभा घेण्यात यावी अशी मागणी झाली. या गोंधळानंतर मंडळाधिकारी रोहीणी आघाव यांनी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करुन ज्यांनी आरक्षण सोडत मान्य नसेल त्यांनी त्यावर वरीष्ठांकडे हरकत घ्यावी असा सल्ला दिला. 
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, अशोकचे कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, भाऊसाहेब पवार, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, शेतकरी संघटनेचे प्रा. कार्लस साठे, संत सावता सोसायटीचे विलास दाभाडे, प्राचार्य जयकर मगर, सुनिल बोडखे, काका रणनवरे, भाजपाचे नारायण काळे, अनिल बोडखे,अक्षय कोकणे, मोहन रणनवरे, आरविंद साळे, भाऊसाहेब गव्हाणे, भाऊसाहेब पटारे, बाजीराव साळवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.  कामगार तलाठी रुपाली रामटेके, ग्रामविकास आधिकारी भिंगारदे यांनी याकामी सहकार्य केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या