तळेगाव ढमढेरे ( प्रतिनिधी)- करंदी (ता.शिरूर) येथील चासकमान कालव्याच्या कडेला एक शेतामध्ये इसमाचा मृतदेह आढळून आला असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील चासकमान कालव्या लगत काही महिला शेतात काम करत असताना त्यांना शेताच्या कडेला एक इसम मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले,
याबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश माने, सरपंच सुनिता ढोकले, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, कैलास ढोकले, सुनील ढमढेरे, विशाल नप्ते यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गावामध्ये अनेक दिवसांपासून राहत असलेल्या सुनील लक्ष्मण बोऱ्हाडे (वय ३४ वर्षे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे) याचा मृतदेह असल्याचे दिसून आले, याबाबत पोलीस पाटील वंदना महेश साबळे (वय ४५ वर्षे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार संदीप बनकर करत आहे.

0 टिप्पण्या