राहुरी प्रतिनिधी : - राहुरी शहरात भरदिवसा एका शेतकऱ्याच्या स्कुटीच्या डिक्कीतून एक लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बारागाव नांदूर येथील आण्णासाहेब जानकू देवकर (वय ६५) यांनी १९ जून रोजी राहुरी बसस्थानकासमोरील महाराष्ट्र बँकेतून मुदत ठेव पावती मोडून एक लाख रुपये काढले होते. ही रक्कम स्कुटीच्या डिक्कीत ठेवून ते घरी निघाले. वाटेत मल्हारवाडी रस्त्यावरील एका दुकानासमोर गाडी उभी करून ते पेंड खरेदीसाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी डिक्की उघडून रोकड लंपास केली.
याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

0 टिप्पण्या