नेवासा(प्रतिनिधी)- जर्मनी येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू वेदांत वाघमारे याने ५० मीटर ३ पी खेळ प्रकारात सांघिक कास्य पदक मिळवून आपल्या गेल्या सात वर्षाच्या कारकिर्दीतील ५० वे मेडल जिंकून विक्रमी कामगिरी केली आहे.
वेदांत नितीन वाघमारे याने आतापर्यंत ०९ आंतरराष्ट्रीय, २५ राष्ट्रीय आणि १६ राज्यस्तरीय मेडल्स जिंकून संस्थेची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आहे, "माझ्या त्रिमूर्तीचा विद्यार्थी ऑलिंपिक मध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकेल" हे शिक्षण महर्षी साहेबराव घाडगेपाटील यांचे स्वप्न होते. वेदांच्या या यशस्वी वाटचालीमुळे ते स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे,अशी भावना त्रिमूर्ती परिवाराने व्यक्त केली.
या यशाबद्दल त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमती साहेबराव घाडगे,उपाध्यक्ष ॲड.स्नेहल चव्हाण, सहसचिव डॉ. श्रुती आमले, कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव आमले, विश्वस्त चेतन चव्हाण, समन्वयका डॉ. अनुराधा गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे, डॉ. बर्गे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आणि पुढील कार्य शुभेच्छा दिल्या. वेदांत वाघमारे यास रायफल शूटिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक छबुराव काळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

0 टिप्पण्या