'सहज' म्हणजे, 'सह' म्हणजे सोबत, आणि 'ज' म्हणजे जन्मलेला. जो तुमच्यासोबतच जन्माला आला आहे, तो म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्याचा, योगाचा तुमचा अधिकार; यालाच सहज योग म्हणतात. सहज योग हा जेव्हा माणूस आदिम होता, जेव्हा तो अमिबा होता, तेव्हाही सहज योग अस्तित्वात होता. त्यानंतर जेव्हा तो चतुष्पाद झाला, तेव्हाही सहज योगच घडला. जेव्हापासून तो द्विपाद झाला, तेव्हाही सहज योगच कार्यरत होता. आणि जेव्हापासून तो मनुष्य झाला, तेव्हाही सहज योगच घटित झाला. आजचा जो सहज योग आहे, तो मनुष्याला त्याच्या अस्तित्वाचा खरा अर्थ सांगण्यासाठी आहे, तो त्याचा अंतिम आणि सर्वोच्च ध्येय आहे. आपल्या भारतवर्षात आदिकाळापासून अनेक ऋषी-मुनींनी मनन आणि ध्यानाद्वारे अंतर्मनातील अनेक गोष्टींचा शोध लावला. परशुरामांच्या काळात, जेव्हा परशुरामांचा जन्म झाला होता, त्या काळात लोकांनी जंगलांमध्ये याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण जगापासून स्वतःला तोडून, कडक ब्रह्मचर्याचे पालन करत, छोट्याशा गुफेत लपून त्यांनी अनेक वर्षे घोर तपस्या केली. त्यानंतर त्यांनी मनुष्याच्या आतील अत्यंत सूक्ष्म आणि गुप्त रहस्यांचा शोध लावला. परंतु, त्यांच्या या शोधकार्याचा लाभखूपच कमी लोकांना घेता आला, कारण हे कार्य अत्यंत सूक्ष्म होते; आणि समाजात राहून हे कार्य करणे अतिशय कठीण होते. या लोकांनी आपल्या धर्मग्रंथांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये, जर त्यांनी याचे महात्म्य लिहिलेही असेल, तर या सूक्ष्म तत्वांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. ३ फेब्रुवारी १९७७ मुंबई अधिक माहितीसाठी
सौजन्य : निर्मला धाम आश्रम, आरडगाव राहुरी
0 टिप्पण्या