अखेर जनतेच्या रेट्यामुळे बारा चारीचे काम स्थगित






मोजणी झाल्यानंतरच पुढील काम होणार ग्रामस्थांच्या बैठकीत एकमत

शिर्डी  : शहराततून जाणारी १२ चारी भूमीगत करू नये यामुळे येथील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सदर काम होवू न देता बंद करावे या मागणी साठी काल प्रभाग क्रमांक  सात व ११ मधील नागरिकांनी  नगरपालिकेवर मोर्चा काढला होता . अखेर जनतेच्या रेट्या मुळे सदर कामास तात्पुरती स्थगिती दिली असून मोजणी झाल्या नंतरच आता कामाची सुरुवात होणार यावर ग्रामस्थांचे एकमत झाले आहे .
  या ज्वलंत प्रश्नासाठी येथील नागरिक संतप्त झाले होते . प्रामुख्याने नगर परिषद चे मुख्याधिकारी सतिश दिघे यांना निशाना करत त्यांचे वर मनमानी व हिटलर शाही चा वापर करत असल्याचा  आरोप करण्यात आला होता . तसेच काम बंद न केल्यास नगर पालीकेवर १८ हजाराचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा  ग्रामस्थांनी दिला होता.
 प्रकरण  हाताबाहेर जात आहे तसेच या उद्रेकाचे गंभीर परिणाम तयार होऊ नये यासाठी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, सोसायटीचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब कोते, उपनगराध्यक्ष अभय शेळके,नगर सेवक अरविंद कोते, सुधीर शिंदे, गणेश सोनवणे, किरण कोते, नानासाहेब शिंदे, दिगंबर कोते अक्षय कोते आदी जेष्ठ नागरिकांची बैठक सोसायटीचे माजी उपाध्यक्ष विनायकराव कोते यांच्या निवासस्थानी पार पडली.
या बैठकीत सदरचारी भूमिगत केल्यामुळे येथील नागरिकांचे कसे हाल होणार आहेत  ही चारी भूमिगत का नको यावर मोठी चर्चा घडली सर्वच रहिवाशांचे असे मत आले की या ठिकाणी भूमिगत चारी केल्यास पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे आम्ही सदर काम होऊ देणार नाही.

       यावर चर्चे अंती असा तोडगा काढण्यात आला की सदरचारीचे मोजमाप करून रस्ता किती ठेवायचा तसेच चारी किती ठेवायची यावर मोजणीनंतर निर्णय होणार आहे .तसेच ना. राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांनाही या कामी मध्यस्थीची भूमिका घेण्यास विनंती करण्यात यावी असाही सूर पुढे आला आहे.
       यावर निर्णय घेताना जोपर्यंत सदर चारी मोजमाप होत नाही तोपर्यंत काम स्थगित ठेवणार असल्याचे एकमत झाले आहे. दत्तनगर परिसरातील ही जाणारी चारी तेथील नागरिक या बैठकीला उपस्थित असल्याने त्या भागातूनही भूमिगत चारीला विरोध असून तेही काम बंद करण्यात आल्याचे समजते.

दै. राष्ट्र सह्याद्रीचे शिर्डीकरांकडून आभार
शिर्डीतील या ज्वलंत प्रश्नावर प्रथमच दै. राष्ट्र सह्याद्रीने यास वाचा फोडून शिर्डीतील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्या प्रकारचे वृत्तही कालच्या अंकात प्रकाशित करण्यात आले होते. यावर काल दिवसभर राष्ट्र सह्याद्रीच्या वृत्ताची शिर्डी शहरात चर्चा होती. तसेच आमच्या ज्वलंत प्रश्नावर राष्ट्र सह्याद्रीने खंबीर भूमिका घेतल्याने राष्ट्र सह्याद्रीचे शिर्डीकरांनी आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या