श्रीगोंदा - तालुक्यातील काष्टी येथील जनावरांच्या बाजारातून बैल खरेदी करून परतणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना गोरक्षकांनी अडवून मारहाण केल्याचा तसेच त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १ जुलैपासून नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील यश अतुल हरकर आणि गणेश जावळे (रा. धाराशिव) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २७ जून रोजी काष्टी येथील जनावरांच्या बाजारातून त्यांनी प्रत्येकी दोन असे चार बैल खरेदी केले. त्याच्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत पावत्याही घेतल्या. बैल घेऊन परतत असताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या एक महिला आणि तीन जणांनी मिळून त्यांची गाडी अडवून "गुरे कापण्यासाठी नेत आहात" असा आरोप करत बेदम मारहाण केली.त्यानंतर संबंधितांनी दोन्ही शेतकऱ्यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणले. बाजार समितीच्या पावत्या आणि शेतकरी असल्याचे पुरावे दाखवूनही पोलिसांनी त्यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.या प्रकरणातील मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी आमच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा १ जुलैपासून नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणाबाबत श्रीगोंदा पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, पोलिसांकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.मात्र याबात प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे याना संपर्क केला असता त्यांनी सांगितले मी सुट्टीवर आहे काय आहे ते उद्या पाहून सांगतो असेही त्यांनी फोनवर सांगितले
बार्शीच्या व्यापाऱ्याच्या माणसाकडून २ हजार उसने घेतले त्यातूनच आली शंका ?
काष्टी येथील सुप्रसीध्द बाजारात धाराशीव येथून बैल घेण्यास आलेल्या दोन शेतकऱ्यांना बैल विकत घेण्यासाठी२ हजार कमी पडल्याने त्यांनी बार्शीच्या व्यापाऱ्याच्या माणसाकडून २ हजार उसने घेतले त्यातूनच शंका बळावली आणि त्याच्यावर दिवसाढवळ्या ट्रॅप झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
गोरक्षकांना शेतकऱ्याच्या गाड्या अडवण्याचा काही अधिकार नाही : अरविंद कापसे संभाजी ब्रिगेड
गोरक्षकांना कोणाच्याही गाड्या अडवण्याचा अधिकार नाही त्यांना माहिती मिळाल्यावर याबाबत पोलिसांना माहिती देण्याचा नियम आहे मात्र श्रीगोंद्यात गाडी अडवून मारहाण केली जाते त्यामुळे श्रीगोड्यातील काष्टी बाजारात येण्याचा जनतेचा कल कमी झाला आहे परिणामी बाजार बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र गोरक्षणासाठी बनवलेला कायदा तालुक्यातील गोरक्षकांनी तो एकदा वाचण्याची गरज निर्माण झाली आहे
.jpg)
0 टिप्पण्या